Praful Patel CBI Clean Chit: सचिन सावंत म्हणतात 'वॉशिंग पावडर' भाजप...

Praful Patel Gets CBI Clean Chit In Corruption Case : देशाचे नागरिक विमान वाहतूकमंत्री असताना विमान खरेदी प्रकरणात 840 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप प्रफुल पटेल यांच्यावर करण्यात आला होता. मात्र, आता राष्ट्रवादी अजित पवार गट भाजपसोबत जाताच सीबीआयकडून प्रफुल पटेल यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
Praful Patel, Ajit Pawar, sachin Sawant, Devendra Fadnavis
Praful Patel, Ajit Pawar, sachin Sawant, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Praful Patel Corruption Case News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे (Ajit Pawar) नेते व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांना सीबीआयकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने आता क्लोजर रिपोर्ट दाखल करत पटेल यांना क्लीन चिट दिली आहे, तर राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर वर्षभराच्या आतच हा क्लोजर रिपोर्ट दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पटेल यांना क्लीन चिट दिल्यामुळे काँग्रेसने (Congress) केंद्र सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षाबरोबर येताच अनेक नेत्यांची चौकशी बंद होते, असा आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे. अशातच आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin sawant) यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत भाजप आणि महायुतीला चांगलाच टोला लगावला आहे.

काँग्रेसप्रणित (Congress) ‘UPA-2’च्या मनमोहन सिंग सरकारमध्ये देशाचे नागरिक विमान वाहतूकमंत्री असताना विमान खरेदी प्रकरणात 840 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्यावर करण्यात आला होता.

मात्र, आता राष्ट्रवादी अजित पवार गट भाजपसोबत गेल्यानंतर सीबीआयकडून (CBI) पटेल यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सचिन सावंत (Sachin sawant) यांनी एक्सवर पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एक्सवर पोस्ट शेअर करताना त्यांनी वॉशिंग पावडर निरमा या जाहिरातीचे विडंबन करून प्रफुल पटेल यांच्यासह भाजपला (BJP) टोला लगावला आहे. सावंत यांनी आपल्या पोस्टमध्ये वॉशिंग पावडरच्या जाहिरातीमधील शब्द वापरले आहेत. ते पुढीलप्रमाणे

Praful Patel, Ajit Pawar, sachin Sawant, Devendra Fadnavis
Congress News : प्राप्तिकर विभागाची नोटीस काँग्रेसला कंगाल करणार

सचिन सावंत यांची एक्स पोस्ट

भाजपा भाजपा

वॉशिंग पाउडर भाजपा

वॉशिंग पाउडर भाजपा

दूध सी सफेदी

भाजपा में आए

जांच एजेंसियों से

क्लीन चिट मिल जाए

भाजपा में एंट्री

कमलछाप पट्टा गले में डाला

भ्रष्ट चरित्र को

पल में निखारा

हेमंत अजित छगन और प्रफुल

सबकी पसंद भाजपा

वॉशिंग पाउडर भाजपा

Praful Patel, Ajit Pawar, sachin Sawant, Devendra Fadnavis
Mumbai Bribe News : दहा लाख लाच मागणाऱ्या पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल...

या ट्विटमध्ये भाजपचा पट्टा गळ्यात घालताच भ्रष्ट लोक पवित्र होतात, यामध्ये अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ आणि प्रफुल पटेल यांच्या नावाचा उल्लेख करत सावंत यांनी भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गटावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे.

विरोधी पक्षाकडून भाजपकडे एक वॉशिंग मशीन आहे, ज्यामध्ये भ्रष्टाचाऱ्यांना स्वच्छ केलं जातं, असा आरोप करण्यात येतो. शिवाय जे नेते विरोधी पक्षात असताना भाजपने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ते भाजपत जाताच त्यांना क्लीन चिट कशी दिली जाते, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com