Akola News  Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Result CountDown : प्रकाश आंबेडकर की अभय पाटील, प्रतापराव जाधव की नरेंद्र खेडेकर ? काउंटडाऊन सुरू

सरकारनामा ब्यूरो

Akola News : मतमोजणीस 4 जूनला सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाच्‍या मतदानाची मतमोजणी ही महाराष्‍ट्र वखार महामंडळ, एमआयडीसी फेज-4, शिवणी, अकोला येथील मतमोजणी केंद्रांवर होणार असून त्‍याकरीता विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय मतमोजणी कक्ष निश्चित करण्‍यात आले आहेत. तर बुलडाण्यात आयटीआय कॉलेज मलकापूर रोड येथे मतमोजणी करण्यात येणार आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघामध्‍ये अकोट, बाळापूर, अकोला (पश्चिम), अकोला (पूर्व), मुर्तिजापूर व रिसोड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मतदान झालेली मतदान यंत्रे ही महाराष्‍ट्र वखार महामंडळ, एमआयडीसी फेज-4, शिवणी, अकोला येथील मतदार क्षेत्रनिहाय तयार करण्‍यात आलेल्‍या सुरक्षा कक्षामध्‍ये सीलबंद करुन ठेवण्‍यात आलेली आहेत. (Lok Sabha Result CountDown News)

मतमोजणी प्रक्रियेकरीता भारत निवडणूक आयोगाकडून (Election Commission) अकोट, बाळापूर व अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार क्षेत्रासाठी रामप्रतापसिंह जाडोन (भा.प्र.से.) तसेच अकोला (पूर्व), मुर्तिजापूर (अ.जा.), रिसोड विधानसभा मतदार क्षेत्रासाठी प्रतुलचंद्र सिन्‍हा (एस.सी.एस) अशा दोन मतमोजणी निरिक्षक यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून त्‍यांचे 2 जूनपर्यंत अकोला येथे आगमन होणार आहे.

मोजणीकरीता मतमोजणी कक्ष हे निवडणूक‍ निर्णय अधिकारी, निवडणूक निरिक्षक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार/प्रतिनिधी व इतर अधिकारी/कर्मचारी यांचे समक्ष सकाळी ७.३० वाजता उघडण्‍यात येतील. मतमोजणी प्रक्रीया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अकोला यांचे नियंत्रणाखाली तसेच नियुक्‍त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे उपस्थितीत पार पडणार आहे.

असे असतील अधिकारी

इव्हीएम (सीयू) (EVM) मतमोजणीसाठी राखीवसह एकूण मतमोजणी पर्यवेक्षक-132, मतमोजणी सहायक-132 व केंद्रशासकीय कार्यालयातील कर्मचारी हे सूक्ष्‍म निरिक्षक म्‍हणून-120 असे एकूण 407 अधिकारी, कर्मचारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. तसेच मतमोजणीच्‍या इतर अनुषंगीक विविध कामकाजाकरीता एकूण 734 कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे. एकूण 15 उमेदवारांकडून नियुक्‍त मतमोजणी प्रतिनिधींची सद्यस्थितीत संख्‍या ही एकूण 508 इतकी आहे.

पोलिसांचा बंदोबस्त

अतिरिक्‍त पोलीस अधिक्षक-1, पोलीस उप अधिक्षक-1, पोलीस निरिक्षक-16 यांच्यासह एकूण 568 पोलीस अधिकारी/कर्मचारी यांची बंदोबस्‍तासाठी नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. फेरिनिहाय निकाल व अंतिम निकालानुसार कल सार्वजनिकरीत्‍या प्रसारित करण्‍यासाठी लाऊडस्‍पीकरद्वारे माहिती देण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे.

14 टेबलवर होणार मतमोजणी

ईव्हीएमव्‍दारे नोंदविलेल्‍या मतांची मतमोजणी ही विधानसभा मतदार (Vidhansbha Election) क्षेत्रनिहाय प्रत्‍येकी 14 टेबल वर करण्‍यात येणार आहे. याशिवाय टपाली मतपत्रिकांची मतमोजणी ही एकूण 16 टेबल वर करण्‍यात येणार आहे.

अशा असतील विधानसभानिहाय मतमोजणी फेऱ्या

अकोट - 24

बाळापूर - 25

अकोला (पश्चिम) - 22

अकोला (पूर्व) - 26

मुर्तिजापूर (अ.जा.) - 28

रिसोड -24

एकूण - 149

SCROLL FOR NEXT