Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरात मतमोजणीच्या दिवशी पोलिस अन् प्रशासनाची कशी आहे तयारी? वाचा...

Kolhapur Lok Sabha Constituency : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील धान्य गोदामात, तर हातकणंगलेची राजाराम तलाव येथील जलसंपदा गोदामामध्ये होणार आहे.
kolhapur district administration
kolhapur district administrationsarkaranama
Published on
Updated on

Kolhapur News, 31 May : गुरुवारी देशातील सातव्या टप्प्यातील प्रचार संपला. एक जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार असून 4 जून रोजी निकाल स्पष्ट होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची संपूर्ण तयारीत झाली आहे.

जिल्हा प्रशासन सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरवात करणार आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि कोल्हापूर पोलिस प्रशासन सर्वतोपरी सज्ज झाले असून अतिसंवेदनशील ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील धान्य गोदामामध्ये, तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील जलसंपदा गोदामामध्ये होणार आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण 686 कर्मचारी नियुक्त केले आहेत. तर, जवळपास कोल्हापूर पोलिस प्रशासनाने 1200 पोलिसांचा बंदोबस्त सज्ज ठेवला आहे.

4 जून रोजी सकाळी 8 वाजता पोस्टल मतदानाला सुरवात होणार आहे. सकाळी 8.30 वाजल्यापासून 'ईव्हीएम'वरील मतमोजणीला सुरूवात होईल. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 349 तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 337 कर्मचारी असे मिळून एकूण 868 कर्मचारी नियुक्त केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूर मतदारसंघासाठी सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 14 मतमोजणी टेबल संख्या आहे. चंदगड 28, राधानगरी 31, कागल 26, कोल्हापूर दक्षिण 24, करवीर 26 आणि कोल्हापूर उत्तरची 23 फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण होणार आहे.

kolhapur district administration
Lok Sabha Election 2024 : पोलिसांच्या 'या' आदेशामुळे विजयानंतरही कार्यकर्त्यांचा हिरमोड होणार; कारण काय?

हातकणंगले मतदारसंघासाठी सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 14 मतमोजणी टेबल संख्या असून, शाहूवाडी व हातकणंगले प्रत्येकी 24, इचलकरंजी 19, शिरोळ व इस्लामपूर प्रत्येकी 21 तर शिरोळसाठी 24 फेऱ्यांतून मतमोजणी पूर्ण होणार आहे.

( Edited By : Akshay Sabale )

kolhapur district administration
Ritesh Kumar News : होमगार्ड व्हायचंय! नऊ हजार जागा भरणार, मानधनही वाढणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com