Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Prakash Ambedkar News : 'सरकारकडून आरक्षणाचा खेळ, जनतेने OBC उमेदवारालाच..' ; प्रकाश आंबेडकरांचं विधान!

Prakash Ambedkar Shivsena News : 'ठाकरे गटाचा मतदार हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेला. त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट चांगला राहिला.', असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे.

योगेश फरपट

Prakash Ambedkar On OBC : 'सरकारकडून ओबीसींच्या आरक्षणाच खेळ चालवला जात आहे. म्हणून ओबीसी जनतेने सावध भूमिका घेत ओबीसी उमेदवारालाच मतदान करावे.' असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने काढण्यात आलेली एससी, एसटी, ओबीसी आरक्षण बचाव रॅली सोमवारी दुपारी जिलह्यात दाखल झाली. यावेळी अकोल्यातील टॉवर चौकात आयोजित सभेत ॲड. प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला.

ठाकरे व शिंदेबाबतीत प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'ठाकरे गटाचा मतदार हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेला. त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट चांगला राहिला, तर काँग्रेसचा मतदार हा ठाकरे गटाला मिळाला. त्यामुळे त्यांचे उमेदवार निवडून आले.' असा दावाही केला.

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रकाश आंबेडकर हे बेचैन झाले असल्याचे म्हटले होते. त्यावर अरविंद सावंत यांना ‘थँक्यू व्हेरी मच’ असं प्रत्युत्तर प्रकाश आंबेडकरांनी दिलं. तसेच, राज्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना शरद पवारांनी(Sharad Pawar) उभे केले असल्याचंही यावेळी ॲड. आंबेडकरांनी सांगितलं.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात निघालेल्या आरक्षण बचाव रॅलीचे अकोला जिल्ह्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आले. एससी, एसटी, ओबीसी आरक्षण बचाव रॅली जिल्हयातील लाखपुरी या गावात पोहोचल्यानंतर या रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर आंबेडकरांनी राधा मंगलम मुर्तीजापुर येथे ओबीसी, एससी, एसटी बांधवांना संबोधित केले. त्यानंतर रॅली अकोल्याकडे रवाना झाली. अकोल्यात टॉवर चौकात वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालयासमोर हजारोच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला ॲड. आंबेडकरांनी संबोधित केले. त्यानंतर रॅली पातुरकडे रवाना झाली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT