Manoj Jarange News : धारशिवमध्ये राज ठाकरेंना घेरणाऱ्या मराठा आंदोलकांवर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Manoj Jarange on Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : 'हे पैशावर झोपणारे लोक आहेत त्यांना गरिबांच्या भावना कळणार नाही. कुणालाही किंमत देऊन जाब विचारू नका.' असं आवाहन मनोज जरांगे यांनी धाराशिवमधील मराठा आंदोलकांना केले आहे.

आज(सोमवार) राज ठाकरे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाकरेनी मराठा आंदोलकांना भेट नाकारली. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

'यांच्या तोंडापुढं देखील उभे राहू नका. हे पैशावर झोपणारे लोक आहेत यांना भावना आणि आरक्षण काय आहे ते कळत नाही. बांग्लादेशमधील परिस्थिती पेक्षा जास्त मस्ती महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना आहे. गोरगरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत.' अशी टीका जरांगे यांनी राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्यावर केली.

Manoj Jarange
Video Maratha Protester Vs Raj Thackeray : मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंना घेरलं; मुक्कामी असलेल्या धाराशिवमध्ये वातावरण तापलं

'आरक्षणाची किंमत गोरगरिबाला कळते सरकारला कळणार नाही. महाराष्ट्रात तसं काही होणार नाही, कारण हे राज्य गोरगरिबांचा आहे.' अशी टीकाही त्यांनी बांग्लादेश मधील परिस्थितीवरून जरांगे पाटील यांनी केली.

प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar)-ज्यांचा आदर आम्ही करतो त्यांना आम्ही काहीही बोलणार नाही" असं उत्तर आंबेडकर यांच्या वक्तव्यावर मराठा आंदोलक जरांगे यांनी दिले.

Manoj Jarange
Eknath Shinde News : अमित शाह, फडणवीसांवरील उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंकडून प्रत्युत्तर!

महाराष्ट्र नवनिर्माण सेना(Maharashtra Navnirman Sena) आता आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर सुरुवात होत आहे.मात्र, आता त्यांच्या दौर्या दरम्यानच मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com