शिवसेना फुटीनंतर खरी शिवसेना कोणाची? ठाकरे की शिंदे याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावण्या सुरू आहेत. यातच पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गट पहिल्यांदाच 13 ठिकाणी आमने-सामने आले होते. यात शिंदे गटाचे 7 तर ठाकरेंचे 6 उमेदवार निवडून आले.
या निवडणुकीत झालेल्या मतदानाचं विश्लेषण करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं सांगितलं आहे. ते अमरावतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची मते फक्त एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्याकडे राहिली आहेत. उद्धव ठाकरे यांचा 'स्ट्राईक रेट' आरक्षणवादी आणि मुस्लिम मतदार यांच्यामुळे वाढला आहे. हे दोन्ही वर्ग धर्मवादी पक्षाचे मतदार नाहीत, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
नेमकं प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं, "एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील निवडणुकीचा स्ट्राईक रेट पाहिला, तर शिंदे यांचा 'स्ट्राईक रेट' डबल आहे. याचा सरळ अर्थ असा की, शिवसेनेची मते फक्त एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली आहेत. एकनाथ शिंदे यांनाच शिवसैनिक खरी शिवसेना मानतो."
"उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईकरेट आरक्षणवादी आणि मुस्लिम मतदारांमुळे वाढला आहे. हे दोन्ही वर्ग धर्मवादी पक्षाचे मतदान नाहीत. उद्धव ठाकरे यांचा मतदार दूर गेला आहे, हे काँग्रेस मांडत नाही. काँग्रेसला कणा असता, तर हे वास्तव मांडलं असते. मात्र, काँग्रेसचा कुणीही नेता हे मांडायला तयार नाही," असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी टीका केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.