Prakash Ambedkar News Sarkarnama
विदर्भ

Prakash Ambedkar : महाविकास आघाडीतील समावेशावरून आंबेडकर अजूनही 'वंचित'! काँग्रेस, राष्ट्रवादीवर साधला निशाणा

Sachin Fulpagare

Maharashtra Politics Latest News : शिवसेना ठाकरे गटासोबत 24-24 असे जागावाटप झाले आहे. महाविकास आघाडीतील समावेशाबाबत बोललोय. पण त्यांनी अद्यापही काहीही सांगितले नसल्याची प्रतिक्रिया वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सेनाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बोलतेय. आता राष्ट्रवादीचा एक बडा नेता ईडीच्या गळाला लागला आहे. ईडीच्या गळाला लागल्यामुळे तो पक्ष शिवसेनेसोबत बोलतोय की नाही? याची माहिती शिवसेनेनेच द्यावी. मोठी जबाबदारी शिवसेनेची आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महाविकास आघाडी समावेशावरून आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका केली. नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर सर्वांनी एकत्र आले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. काँग्रेस एकीकडे हो म्हणते आणि दुसरीकडे काहीच निर्णय घेत नाही. काँग्रेसची भूमिका ही दुटप्पी आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

आमची बोलणी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत झाली नाहीत. आमची बोलणी ही फक्त शिवसेनेसोबत (ठाकरे गट ) झाली आहेत. शिवसेनेने आम्हाला सांगितले आहे, की आम्ही वंचितला सोबत घेऊ. आम्हाला महाविकास आघाडीच्या युतीमध्ये यायचे आहे. पण आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वीकारले नाही आणि स्वीकारले असेल तर त्यांनी शिवसेनेला सांगितले नाही. आम्हाला इंडिया आघाडीमध्ये यायचे आहे. पण अजूनपर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी मला कळवलेले नाही, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणावरून आंबेडकर यांनी रवी राणांवर टीका केली. राणांची पत्नी खासदार नवनीत राणा या पुढील सहा महिन्यांमध्ये तुरुंगात दिसतील, असे आंबेडकर म्हणाले. तसेच राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आपल्याला निमंत्रण मिळालेले नाही. सर्वांना निमंत्रण दिल्याचा हा एक प्रचार आहे, असा टोला त्यांनी लगावला.

edited by sachin fulpagare

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT