Yavatmal : अपघातानंतर आमदार भोंडेकर पळाले अन‌् पोलिसही; एफआयआरही नाही

Narendra Bhondekar : जखमींना रुग्णालयात नेणे दूर, विचारपूसही नाही; पोलिसांना फोनही टाळला
Accident To MLA Narendra Bhondekar.
Accident To MLA Narendra Bhondekar.Sarkarnama
Published on
Updated on

Narendra Bhondekar : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात आलेल्या सावंगा गावाजवळ भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या ताफ्यातील पोलिस ‘एस्कॉर्टिंग’ वाहनाला अपघात घडल्यानंतर संवेदनशीलता दाखविण्यापेक्षा भोंडेकर आणि पोलिसांनी अपघातस्थळावरून अक्षरश: पळ काढल्याचा आरोप सावंगा येथील घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ग्रामस्थांनी केला आहे.

अपघात घडल्यानंतर आमदार भोंडेकर यांनी जखमींना रुग्णालतया हलविण्यासाठी धावपळ करणे तर दूरच साधी विचारपूसही केली नाही, असे अपघातस्थळी जमलेल्या गर्दीतील अनेकांनी सांगितले. ताफ्यात असलेल्या पोलिसांच्या MH36-2272 क्रामांच्या ‘एस्कॉर्टिंग’ वाहनाचे समोरचे चाक तुटले अन्यथा हे वाहन घेऊनही सर्वांनी पळ काढला असता असे संतप्त ग्रामस्थांनी सांगितले.

Accident To MLA Narendra Bhondekar.
Yavatmal : ‘वाय’ सुरक्षा असलेल्या आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या ताफ्यातील अपघातावर शंकांचे वलय!

अपघात घडल्यानंतर पोलिसांचे ‘एस्कॉर्टिंग’ वाहनाने तर पोलिस नियंत्रण कक्ष किंवा दिग्रस पोलिसांना कळविले नाहीच परंतु आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी देखील यवतमाळचे पोलिस अधीक्षक प्रवीण बनसोड, संबंधित पोलिस उपअधीक्षक, दिग्रस पोलिस स्टेशन किंवा पोलिस नियंत्रण कक्षाला कळविले नसल्याचे खुद्द पोलिसांनी सांगितले. संपूर्ण यवतमाळ पोलिस दलाचे संपर्क क्रमांक https://yavatmalpolice.gov.in या इंटरनेट संकेतस्थळावर असताना आमदार भोंडेकर यांना किंवा पोलिसांपैकी कुणालाही या भीषण अपघताबद्दल कळविण्याची गरज वाटली नाही.

जमाव हल्ला करेल या भीतीपोटी जरी आमदार भोंडेकर आणि पोलिस घटनास्थळवरून निघून गेले तरी त्यांना थोडावेळाने दिग्रस पोलिस स्टेशन गाठत रितसर एफआयआर करता आला असता. परंतु शुक्रवारी (ता. 5) रात्री 11.35 वाजेपर्यंत दिग्रस पोलिस ठाण्यात नियमित अधिकाऱ्यांशिवाय कुणीच नव्हते व याप्रकरणाचा एफआयआरही दाखल झाला नव्हता. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील पोलिस यंत्रणेचे कामकाज आता ‘सीसीटीएनएस’ प्रणालीमुळे ‘ऑनलाइन’ आले आहे. अशात या अपघाताची माहिती सर्वप्रथम पोलिसांना कुणी दिली, दिग्रस पोलिस ठाण्यातून ‘ऑनलाइन साना’ टाकत कोण कोण रवाना झाले हे ‘सीसीटीएनएस’ कालांतराने प्रणालीमुळे उघडकीस येईलच.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

‘रिप्लाय’ नाही द; स्वीय सहाय्यक म्हणतात..

नऊ अत्यंत गंभीर जखमी आणि वाहनांचा चुराडा होण्याला कारणीभूत ठरलेल्या या अपघातानंतर आमदार भोंडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही ‘रिप्लाय’ मिळाला नाही. भोंडेकर यांचे स्वीय सहाय्यक आणि नीकवर्तीय ‘साहेब सुखरुप आहेत’ हेच केवळ सांगत होते. भोंडेकर घटनास्थळावरून निघून गेले, जखमींचे काय झाले, अपघात नेमका कशामुळे घडला हे सांगायाला कुणीही तयार नव्हते; ना भोंडेकरांचे नीकटवर्तीय ना पोलिस अधिकारी. विशेष म्हणजे आमदार भोंडेकर यांच्याकडून व्यक्तीश: किंवा त्यांच्या कार्यालयाकडून शुक्रवारी (ता. 5) रात्री 11.58 पर्यंत कोणतीही अधिकृत माहिती किंवा शंकांचे वलय निर्माण करणाऱ्या एकाही आरोपांचे खंडन करणारी बाजू जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे हे प्रकरण नेमके काय आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Accident To MLA Narendra Bhondekar.
Reality of Hit and Run : हिट अँड रनचे देशातील वास्तव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com