tanaji sawant  sarkarnama
विदर्भ

Praniti Shinde vs Tanaji Sawant : प्रणिती शिंदे, तानाजी सावंत यांच्यात जुंपली...

Sudesh Mitkar

Nagpur News : आरोग्य विषयक विषयांवर विधानसभेत चर्चा सुरू असताना सोलापूर रुग्णालयाच्या विषयावरून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यात जुंपली. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी करत हा विषय मिटवला.

सोलापूर जिल्हा रुग्णालयात जाणवत असलेला औषधांच्या तुटवडा आणि विविध तपासण्याची मशीनच्या उपलब्धेसंदर्भात प्रणिती शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना तानाजी सावंत यांनी हा आपल्या विभागांतर्गत विषय नसून आपल्याला संबंधित लोकप्रतिनिधींनी कधीही पत्र दिलं नाही, असं उत्तर दिलं. या उत्तराने प्रणिती शिंदे यांचा पारा चढला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या या उत्तरावर विधानसभा अध्यक्षांनी सावंत यांचे कान टोचले. ते म्हणाले, "लोकप्रतिनिधींनी पत्र दिले तरच काम करायचं असं नसतं. जनतेचे प्रश्न सोडवणं सरकारचं काम असते. ते फक्त सरकारचे नाही तर लोकप्रतिनिधीचे देखील काम आहे. त्यामुळे पत्र नाही तर काम नाही, असं तुम्ही म्हणू शकत नाही, असे अध्यक्षांनी सुनावलं.

काय म्हणल्या होत्या प्रणिती शिंदे ?

शिंदे यांनी सोलापूर जिल्हा रुग्णालयातील गोळ्यांच्या तुटवड्याबाबत बोलताना सांगितले, "आरोग्य शिबिरांमध्ये लोह, मधुमेहाच्या गोळ्या जबरदस्ती वाटल्या जात आहेत. ज्यामुळे जिल्हा रूग्णालयात गर्भवती महिलांना या गोळ्या उपलब्ध होत नाही. तसेच रुग्णालयात सीटी स्कॅनच्या मशिन्स बंद आहेत, त्यामुळे रुग्णांना पैसे खर्च करून प्रायव्हेटमध्ये जावं लागत आहे. त्यामुळे निष्कारण भूर्दंड पडत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT