Delhi News ;लोकसभेच्या सुरक्षेतील मोठी चूक समोर आली आहे. दोन अनोळखी व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारल्याने गदारोळ झाला आणि सभागृह तहकूब करण्यात आले. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आता लोकसभेचे काम पुन्हा सुरू झाले असून यावेळी एक समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तूर्तास काळजी करण्याची गरज नाही अशी माहिती अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली.
संसदेच्या प्रेक्षक गॅलरीत दोन व्यक्ती घुसल्याने बुधवारी लोकसभेत गदारोळ झाला. लोकसभेतील शून्य तासा सुरू असताना दोन मुलांनी प्रेक्षक गॅलरीतून अचानक खाली उडी मारली, त्यांनी पिवळा गॅसही सोडला. त्यानंतर काही काळ सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यानंतर काही वेळा नंतर कामकाजाला सुरुवात झाली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेची प्राथमिक चौकशी करण्यात अली असून काळजी करण्याची काही गरज नसल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून याची माहिती संसदेला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बिर्ला म्हणाले, "लोकसभेच्या घटने संदर्भात दिल्ली पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. आपल्या सगळ्यांना जी चिंता वाटत होती की ज्या धुराचे लोट पसरवण्यात आले. तो नेमका काय आहे. परंतु प्राथमिक तपासात तो धूर सर्वसाधारण धुरा प्रमाणेच होता. फक्त काहीतरी गदारोळ घडला पाहिजे या उद्देशाने या धुराचे लोट पसरवले गेले होते . तो धूर हा चिंतेचा विषय नाही", असे बिर्ला म्हणाले.
"तसेच यापूर्वी अनेक घटना घडला तेव्हा देखील संसदेचे कामकाज सुरु होते. आणि या घटने नंतर देखील सभागृह सुरु करणे हे आपले काम आहे. कोणतेही घटना संसदचे कामकाज बंद करू शकत नाही" असे बिर्ला म्हणले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.