Sanjay Raut, Prasad Lad Sarkarnama
विदर्भ

Sanjay Raut vs Prasad Lad : राऊतांवर टीका करताना लाड यांची जीभ घसरली, थेट शिवीगाळ केली

Prasad Lad On Sanjay Raut : संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे...

Sachin Fulpagare

Maharashtra Politics News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना भाजप आमदार प्रसाद लाड यांची जीभ घसरली आहे. संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना प्रसाद लाड यांनी शिवीगाळ केली आहे. संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत प्रसाद लाड यांच्या कंपनीचा उल्लेख करत मोठा आरोप केला होता.

प्रसाद लाड यांच्या कंपनीचा हजारो कोटींचा घोटाळा आहे. आता त्यांच्यावर छापेमारी करा. ईडी फक्त भाजप विरोधकांवर कारवाई करण्यासाठी आहे का? फक्त भाजप विरोधकांनाच टार्गेट केले जात आहे. भाजपच्या लोकांकडे एक लाख कोटींचा काळापैसा असू शकतो, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणाले प्रसाद लाड?

संजय राऊत यांच्या आरोपांना प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले. शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद ऐकली. सातत्याने तो (संजय राऊत) माझा आणि माझ्या कंपनीचा उल्लेख करतोय. प्रसाद लाड आणि क्रिस्टल कंपनीचा एक हजार कोटींचा भ्रष्टाचार आहे, असा आरोप केला. संजय राऊतांच्या संसदीय भाषेत बोलायचे झाले तर संजय राऊत XXX झाला आहे. ज्याच्याशी काहीही संबंध नाही, अशी टीका करत प्रसाद लाड यांची जीभ घसरली.

यापुढे त्यांनी (संजय राऊत) माझे किंवा माझ्या कंपनीचे नाव घेतले तर स्वप्नातला संजय राऊत काय आहे? हे मी मीडिया समोर आणेन. त्याचे (संजय राऊत ) व्हिडिओ आणेन आणि सगळ्या गोष्टी जनतेसमोर उघड करेन, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT