Nagpur Congress Sarakarnama
विदर्भ

Nagpur Congress : आसाराम बापूविरोधात महिला काँग्रेस रस्त्यावर; आक्रमक आंदोलन

प्रसन्न जकाते

Nagpur Congress : बलात्काराचा कथित आरोप असलेले आरोपी आसाराम बापू यांच्या विरोधात नागपुरात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस महिला सेलच्या नॅश नुसरत अली यांच्या नेतृत्वात आसाराम बापूंच्या पोस्टला काळे फासण्यात आले. आसाराम बापू यांच्याविरोधात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अशात सरकारने तातडीने यासंदर्भात कारवाई करणे गरजेचे आहे, असे नॅश नुसरत अली या वेळी म्हणाल्या. महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतेही दुर्लक्ष आणि सरकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. अशात आसाराम बापू यांच्यासारखे लोक कारागृहात बंद आहेत. यासंदर्भात सखोल तपास करीत सत्य जगापुढे आलेच पाहिजे, अशी मागणीही नॅश अली यांनी केली. नागपुरातील बैद्यनाथ चौकात अशा घटनांचा निषेध करण्यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले. शहरात आसाराम बापू यांचे अनेक ठिकाणी पोस्टर लागले आहेत.

आसाराम बापू यांच्यासारख्या लोकांनी लोकांच्या धर्म, आस्था आणि विश्वासाचा गैरफायदा घेतला आहे. सध्या आसाराम बापू कारागृहात आहेत. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरात असे पोस्टर्स उभारलेच कसे जाऊ शकतात, असा प्रश्नही नॅश नुसरत अली यांनी उपस्थित केला. गृहमंत्र्यांच्या शहरात जर असे प्रकार घडत असतील तर राज्यातील महिला किती सुरक्षित आहेत, याचा विचार करावा लागले, असेही त्या म्हणाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात आपले प्राबल्य असल्याचा दावा भाजप करते. अशात या भागात जर बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तींचे उदात्तीकरण करणारे पोस्टर्स लागत असतील आणि सत्ताधारी त्याकडे दुर्लक्ष करीत असतील, तर याला काय म्हणायचे, असा सवालही नॅश नुसरत अली यांनी उपस्थित केला आहे. भाजपनेही असे पोस्टर्स उखडून फेकण्यासाठी पुढे आले पाहिजे. आमच्या भागाचा विकास झाला नाही. त्यामुळे आम्ही भाजपचे मतदार असूनही यंदा भाजपला मत देणार नाही, असे पोस्टर्स काही महिलांनी अकोला शहरात उभारले होते. महिलांचे हे पोस्टर्स अकोल्यातील भाजपच्या एका माजी नगरसेवकाने फाडून टाकले होते. हा महिलांचा अवमानच आहे. अशाच भाजपचे कार्यकर्ते नागपुरातही आहेत. त्यांना असे पोस्टर्स दिसत नाहीत का, ज्यांनी महिलांचे शोषण केले आहे, असा संतापही काँग्रेसच्या नॅश यांनी व्यक्त केला.

नॅश नुसरत अली यांच्यासोबत कल्पना गाडगे, संगीता खापर्डे, गीता जळगावकर, वंदना चहांदे, नंदा अतकरे, कल्पना द्रोणकर, माया धापोडकर, भानुमती नंदनवार, रजनी राऊत, राणी सालवे, वंदना शेवतकर, किरण मोहिते, समता गणवीर, रेखा गारोडी, त्रिवेणी नंदनवार, किरण रणदिवे, रोशनी पराते, स्मिता खवासे, संगीता खवासे, पुष्पा नररारे, कविता घुबडे, अनुष्का वानखेडे यांनीही दक्षिण पश्चिम नागपुरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात सहभाग घेत महिला अत्याचाराच्या घटनांचा तीव्र निषेध केला.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT