Rahul Bondre Sarkarnama
विदर्भ

Rahul Bondre : भाजपला चकवा देणाऱ्या राहुल बोंद्रेंना पोलिसांची नोटीस; 35 वर्षांची माहिती मागितल्याचा दावा, म्हणाले, 'मागे हटणार नाही'

Former Chikhli Congress MLA Rahul Bondre alleges political pressure over police inquiry notice, claiming authorities sought records spanning 1992 to 2026 within seven days : भाजप प्रवेशाची घोषणा मागे घेत काँग्रेसमध्येच राहिलेल्या चिखलीच्या माजी आमदारांचा आरोप; पोलिसांच्या चौकशीमागे सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचा दावा.

Pradeep Pendhare

Rahul Bondre Police Notice : सत्ताधारी भाजपला चकवा देणारे, काँग्रेसचे बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या मागे पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. राहुल बोंद्रे यांनी समोर येते व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. या सर्वांमागे कोण आहे, याची कल्पना आहे.

पण आम्ही लोकशाहीवर, संविधानावर, घटनेवर प्रेम करणारे आहोत. राहुल गांधींच्या लढ्यात सर्व अर्पण करण्याची तयारी सुरू केली आहे. या नोटिशीने मागे हटणार नाही, असा ठाम इशारा काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

बुलढाण्यातील चिखलीचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजपमध्ये (BJP) जाण्याची तयारी केली होती. 20 सप्टेंबरला तशी त्यांनी 'फेसबुक लाईव्ह' करत घोषणा केली होती. राहुल बोंद्रे 22 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थी करत राहुल गांधी आणि राहुल बोंद्रे यांची फोनवरुन चर्चा घडवून आणली. या चर्चेदरम्यान राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसमध्येच थांबणार असल्याचा शब्द राहुल गांधी यांना दिला.

आता काँग्रेसमध्ये (Congress) राहिलेल्या राहुल बोंद्रे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. यासंदर्भात त्यांनी व्हिडिओद्वारे माहिती देताना सांगितले, याचा देखील अंदाज आला होता. तशी माझी आणि सहकाऱ्यांनी मनाची तयारी केली होती, असे त्यांनी सांगितले. पोलिस उपअधीक्षक यांच्याकडून चौकशीची नोटीस सर्व संस्थांना प्राप्त झाली. हे मागचेच प्रकरण आहे. ते शांत होते. पण अचानक पोलिसांना जाग आणि सर्व संस्थांना नोटीस पाठवली. 1992 सालापासून ते 2026 पर्यंतची प्रचंड माहिती मागवली असून, ती सात दिवसात देण्याचे फर्मान धाडल्याकडे राहुल बोंद्रे यांनी लक्ष वेधले.

माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर जुने गुन्हे दाखल आहेत. त्याच्या चौकशीसाठी ही नोटीस आहे, असे सांगण्यात आले. चौकशीसाठी पहिला अधिकारी हा चिखली पोलिस ठाण्याचा कोणीतरी अमलदार होता. ही चौकशी आता पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे. पोलिस उपअधीक्षकांनी जी तक्रार आहे, त्या अनुषंगाने माहिती मागवलेली नाही. त्याच्या व्यक्तिरीक्त माहिती मागवत बसले आहे. गेल्या 35 वर्षांची माहिती मागवल्याचा दावा राहुल बोंद्रे यांनी केलाय.

भाजपमध्ये जाण्याचा विचार व्यक्त केला अन्.....

विद्यार्थी, स्काॅलरशीप, अशी वेगवेगळी प्रचंड माहिती मागवली आहे. जी तक्रारीत नाही, अशी माहिती मागवली आहे. याचाच अर्थ पोलिस उपअधीक्षक दबावाखाली काम करत आहे, असा आरोप राहुल बोंद्रे यांनी केला. आठ जून अगोदर सरकारविरोधात समाज माध्यमांवर काही पोस्ट केल्या होत्या. यानंतर लगेचच 13 जूनला माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांविरोधात खोटे आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली. पुढे न्यायालयीन लढाईत जामीन मिळाला. भाजपमध्ये जाण्याचा विचार व्यक्त केला. पण राहुल गांधींच्या एका फोनमुळे थांबलो, असे राहुल बोंद्रे यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीच्या प्रचारात अन् नोटीस.....

अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. या मतदारसंघातील शाळांना भेटी देत असतानाच, पोलिसांच्या चौकशीची नोटीस आली. याचा अर्थ लगेचच समजतो. ही नोटीस म्हणजे, लोकशाहीची गळचेपी करणारी आहे. पोलिस अशा पद्धतीने वागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी गोष्टी आहे, असा घणाघात राहुल बोंद्रे यांनी केला.

न्याय व्यवस्थेवर विश्वास

नोटीस येतच राहणार, गंभीर गोष्टी होणार, याबाबत मनाची संपूर्ण तयारी आहे. पोलिसांना कोण सूचना देत आहे, हे आम्हाला माहिती आहे. पण यात न्याय व्यवस्थेवर विश्वास असून, राहुल गांधींच्या या लढ्यात सर्व अर्पण करण्याची तयारी आम्ही केलेली आहे. देशाची लोकशाही, संविधान, घटना आम्हाला प्राणापेक्षा प्रिय आहे. त्यामुळे शांतपणाने या सर्व गोष्टींना समोरे जाणार आहोत, असे राहुल बोंद्रे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT