Nagpur News : नागपूर विधानभवनाचा विस्तार आणि अत्याधुनिक नव्या इमरातीच्या उभारणीसाठी अधिग्रहित केलेल्या जागेवरून अन्न व नागरी पुरवठा आणि शासकीय मुद्रणालय दोन विभागात आता वाद सुरू झाला आहे. मुद्राणलयाला आपली जागा देण्यास पुरवठा विभागाने नकार कळवून हरकतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना आपल्याच निर्णयावर या हरकतीच्या मुद्द्यावर उत्तर देऊन तोडगा काढावा लागणार आहे.
विधानभवनाच्या विस्तारासाठी मुद्रणालयाची जागा निश्चित करण्यात आली आहे. हे मुद्राणालय शेजारीच असलेल्या अन्न नागरी पुरवठा विभागाच्या जागेवर हलवायचे ठरवण्यात आले आहे. मात्र, पुरवठा विभागाने यावर हरकत घेतली. आमचा आवाका मोठा आहे. अन्न धान्य ठेवण्यासाठी आधीच जागा अपुरी पडत असल्याने जागा देण्यास नकार कळवला असल्याचे समोर आले आहे.
मुंबईत झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली. सिव्हील लाईन्स परिसरातील शासकीय मुद्राणालयाच्या 16 हजार 182 चौ.मी. जागेपैकी 9 हजार 670 चौ.मी.वर राज्य विधीमंडळ इमारतीचा विस्तार होणार आहे. सदर जागा महाराष्ट्र विधानमंडळास हस्तांतरित करण्यास उद्योग विभागाने ना-हरकत (एनओसी) दिली आहे. तर त्या बदल्यात मुद्रणालयाला अन्न नागरी पुरवठा विभागाची जागा दिली आहे. ता. 16 डिसेंबरच्या बैठकीत अतिरिक्त जागेसाठी शिक्कामोर्तब झाले होते.
विधानभवनाच्या विस्तारीकरणासाठी मुद्रणालयाची जागा निश्चित करण्यात आली. शासकीय मुद्रणालय उद्योग विभागाच्या अंतर्गत असल्याने महसूल विभागाला हस्तांतरित करणे आवश्यक होते. त्यासाठी उद्योग विभागाने कुठलीही हरकत घेतली नाही. या निर्णयाने सेंट्रल हॉलसह येथील विधानभवनच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला.
उद्योग विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार नागपूर यांचे काम अखंडित सुरू राहण्यासाठी मुद्राणालयास अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे असलेल्या जागेपैकी 9670 चौ.मी.जागा देण्याचे 29 मार्च 2025 च्या उद्योग विभागाच्या शासन निर्णयाव्दारे मागणी करण्यात आली. मुद्रणालयास ही जागा हस्तांतरीत करण्यासाठी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी हे कार्यवाही करतील, असा उल्लेख त्या शासन निर्णयात आहे.
पुरवठा विभागाकडे ज्या जागेची मागणी मुद्राणालयासाठी करण्यात येत आहे. त्या पाच गोडाऊनमध्ये विभागाचे झोन कार्यालय कार्यरत आहे. तर उर्वरित गोडाऊनमध्ये सीएमआर कडून येणारा तांदूळ ठेवण्यात येतो. त्यामुळे मुद्राणालयाला जागा देण्यास विभाग अनुत्सुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुरवठा विभागाकडून जागा देण्यास नकार कळवण्यात आल्याचे समोर आले आहे. या जागेच्या प्रश्नावरून येत्या आठवड्यातच अध्यक्षांकडे एक बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आहे. त्या बैठकीत जागेच्या वादावर तोडगा काढण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.