BJP couple marriage : भाजपच्या कार्यकर्त्या रिंकू यांच्याकडून 61 वर्षाच्या नेत्याला प्रपोज; दोघे अडकणार विवाह बंधनात

Rinku Mujumdar and Dilip Ghosh Marriage : पश्चिम बंगाल भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ ज्येष्ठ नेते आणि महिला कार्यकर्त्या रिंकू मुजूमदार विवाह बंधनात अडकणार आहेत.
Rinku Mujumdar, Dilip Ghosh
Rinku Mujumdar, Dilip GhoshSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : भाजपच्या एका 61 वर्षांच्या ज्येष्ठ नेत्याला एका महिला कार्यकर्त्याने प्रपोज केले अन् आता या दोघांचे लग्न होत आहे... होय, हे खरं आहे. पश्चिम बंगाल भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ ज्येष्ठ नेते आणि महिला कार्यकर्त्या रिंकू मुजूमदार विवाह बंधनात अडकणार आहेत. घोष हे अविवाहित आहेत. तर रिंगू यांना एक 17 वर्षांचा मुलगा आहे.

दिलीप घोष यांच्या घरीच हे लग्न अत्यंत साधेपणाने होणार आहे. त्यानंतर विवाहाची नोंदणी केली जाईल. दोघेही बंगालमधील न्यू टाऊन भागात पक्षाचे काम करतात. दिलीप घोष हे बंगालमधील भाजपचे मोठे नाव आहे. ते आमदार-खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्षही होते. तर रिंकू या महिला मोर्चामध्ये सक्रीय होत्या. घोष आमदार असल्यापासून रिंकू आणि त्यांची ओळख होती.

Rinku Mujumdar, Dilip Ghosh
Pakistan Vs Bangladesh : लाखो महिलांवर बलात्कार, हत्या..! पाकिस्तानी सैन्याचा नरसंहार, बांग्लादेशने खपली काढली...

मीडियाशी बोलताना रिंकू यांनी या विवाहामागची कहाणी सांगितले. त्या म्हणाल्या, घोष हे आमदार-खासदार असताना मी ब्लॉक स्तरावर पक्षाचे काम करायचे. आम्ही 2021 मध्ये पहिल्यांच बोललो. पण तेही पक्षाशी संबंधित बोलणे होते. लोकसभा निवडणुकीवेळीही बोलणे वाढले. सप्टेंबर महिन्यात मी आयुष्यात स्थिरस्थावर होण्याबाबत विचार करू लागले. माझे राजकीय करिअर स्वीकारणारे कोणाशी तरी विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि दिलीप घोष यांचा विचार आला.

माझ्या मतदारसंघात तेच एक चांगले अविवाहित व्यक्तिमत्व होते. इतर राजकीय नेत्यांप्रमाणे ते नाहीत. त्यामुळे मग त्यांना विवाहासाठी विचारणा केली. मात्र, त्यावेळी त्यांनी लगेचच नकार दिला. पण पुढे तीन महिने त्यांनी विचार केला. आईचे मत जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी तयारी दर्शविल्याचे रिंकू यांनी सांगितले.

Rinku Mujumdar, Dilip Ghosh
BJP Politics : महाराष्ट्रात शिवसेनेबाबत जे घडलं, तेच अण्णाद्रमुकसोबत होण्याची भीती!

दिलीप घोष यांना या विवाहबाबत विचारणा केली असता त्यांनी अत्यंत विनोदी शैलीत याचे उत्तर दिले. मी लग्न करू शकत नाही का? लग्न करणे हा गुन्हा आहे का, असे उलट प्रश्न त्यांनी माध्यम प्रतिनिधींना करत विवाहाबाबत सूचक संकेत दिले. शुक्रवारी या दोघांचा हिंदू पध्दतीने विवाह होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com