Nagpur News : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल दोन दशकानंतर एका व्यासपीठावर आले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. पण आता मुंबई महापालिका कोणाची यावरून दावे-प्रतिदावे केले जात आहे. मात्र भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधुंना इशारा दिला आहे. बावनकुळे यांनी, दोन्ही भाऊ सत्तेसाठी एकत्र आले असतील तर त्यांनी ते विसरून जावे. कारण हे पुढचे 15 वर्षे तरी शक्य नाही. महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार राहणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. तसेच त्यांच्या एकत्र येण्याने काही फरकही पडत नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. (Chandrashekhar Bawankule's reaction to Raj Thackeray and Uddhav Thackeray's reunion and its impact on Maharashtra politics and BMC elections)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषा पर्यायी असल्याचे यापूर्वीच अनेकदा स्पष्ट केले आहे. या संदर्भाचा शासनादेशही मागे घेतला आहे. यामुळे आता हिंदी-मराठी भाषेचा वादच उद्भवत नाही. असे असतानाही दोन्ही भावांनी विजय सभा घेतली. त्यांचा अजेंडा ठरला होता. ही सभा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी घेतली आहे.
मात्र शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) भाषा आणि सहानुभूतीच्या राजकारणाला मुंबईची जनता कंटळाली आहे. अनेक दशकांपासून मुंबई महापालिकेत उद्धव सेनेची सत्ता आहे. आजवर त्यांनी मराठी माणसासाठी काय केले, असा सवाल मुंबईकर जनताच त्यांना विचारत असल्याचा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.
या उलट भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला विकसित राष्ट्र करण्याच संकल्प केला आहे. भाजपने 2023 पर्यंत विकसित महाराष्ट्राचा अजेंडा तयार केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला आता विकास हवा आहे. याकरिता विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारला जनतेनं सत्तेवर बसवले.
विजयी सभा ही फक्त सहानुभूतीचा कार्यक्रम असून सुप्रिया सुळे यांना मंचावर स्थान देण्यात आले नव्हते. काँग्रेसची उपयोगितता तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी संपल्यात जमा आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला निमंत्रणच दिले नाही. या सभेला प्रचंड गर्दी होती असा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात मतदार किती होते हे महत्त्वाचे आहे. या सभेपेक्षा भाजप प्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याला जास्त गर्दी होती, असा दावाही बावनकुळे यांनी यावेळी केला.
विधानसभेच्या निवडणुकीत महायुती निवडूण आली आहे. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतसुद्धा भाजचेच सर्वाधिक नगरसेवक निवडूण येणार आहे. मुंबई महापालिकेवर भाजप महायुतीचाच झेंड फडकणार आहे. त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे बंधू सत्तेसाठी एकत्र आले असतील तर त्यांनी ते विसरून जावे, असाही सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.