Krupal Tumane, Rajiv Potdar Sarkarnama
विदर्भ

Krupal Tumane: 'उगाच वड्याचे तेल वांग्यावर काढून महायुतीचे..' ; कृपाल तुमानेंना भाजपच्या पोतदारांनी सुनावले!

Mayur Ratnaparkhe

-राजेश चरपे

Ramtek Lok Sabha Constituency Election Result : रामटेकच्या पराभवाचे खापर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर फोडणाऱ्या माजी खासदार कृपाल तुमाने यांच्या वक्तव्यावर भाजपचे नेते चांगलेच भडकले आहेत. त्यांना उमेदवारी देण्याचा किंवा नाकारण्याचा निर्णय सर्वस्वी शिवसेनेचा आहे. याची दाद त्यांनी आपल्या पक्षाकडे मागावी. उगाच वड्याचे तेल वांग्यावर काढून महायुतीचे वातावरण खराब करू नये, अशा शब्दात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी त्यांना सुनावले.

चंद्रशेखऱ बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांच्या हट्टामुळे दोन वेळा निवडूण आलो असतानाही आपले तिकीट कापण्यात आले. यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकण्यात आला. सर्वेचे खोटे आकडे सादर केले. तसेच महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या विजयाची हमी त्यांनी घेतली होती. याची तक्रार आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करणार असल्याचे सकाळीच माध्यमांसोबत बोलताना तुमाने यांनी सांगितले होते.

यास प्रत्युत्तर देताना पोतदार म्हणाले, 'केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांच्यासह शिवसेना आणि महायुतीचे सर्वच घटपक्ष यात सहभागी आहेत. राज्यातही महायुतीचे सरकार आहे. असे असताना तुमाने यांनी युतीमधील वातावरण खराब करू नये. ते यापूर्वी दोन वेळा रामटेक लोकसभा निवडूण आले आहेत. त्यावेळी भाजपच्याच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. त्यांच्या विजयात भाजपच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा होता.'

तसेच 'भाजपने रामटेक लोकसभेची मागणी केली होती. तो आमचा अधिकार आहे. मात्र महायुतीचा धर्म पाळायचे असल्याने आम्ही हट्टा केला नाही. महायुतीचा जो उमेदवार ठरेल त्याचे काम करायचे असे ठरवले होते. आपल्या पक्षाकडून उमेदवारी आणण्याची जबाबदारी तुमाने यांची होती.' असंही पोतदार म्हणाले.

याशिवाय, 'राजू पारवे(Raju Parwe) यांच्याऐवजी तुमाने असते किंवा नसते तरी आम्ही काम केलेच असते. पारवे यांच्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली. दुर्दैवाने निकाल आमच्या बाजूने लागला नाही. विधानसभेच्या सर्व सहा मतदारसंघात भाजपची पिछेहाट झाली आहे . ही वस्तुस्थिती आहे, यात बावनकुळे यांचा दोष नाही.

कामठी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार नाही. येथे टेकचंद सावरकर आमदार आहेत. शिवसेनचा आमदार असलेल्या रामटेक विधानसभेतही पारवे यांना मताधिक्य मिळाले नाही. पराभव झाला म्हणून सर्वांनी राजीनामे द्यावे आणि घरी बसावे असा याचा अर्थ होत नाही, अशा शब्दात पोतदार यांनी तुमाने यांना सुनावले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT