Krupal Tumane News : पीएम मोदींनी तुमाने यांची घेतली दखल; पुनर्वसन केव्हा, कसे होणार?

Shivsena Political News : शिवसेनेसाठी रामटेकच्या खासदारकीवर पाणी सोडणारे कृपाल तुमाने यांचे पुनर्वसन केव्हा आणि कधी होणार ? याची चर्चा सध्या रामेटक लोकसभा मतदारसंघात रंगली आहे.
Eknath Shinde, Krupal Tumane
Eknath Shinde, Krupal TumaneSarkarnama

Nagpur News : रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कन्हान येथे सभा झाली होती. यावेळी तुमाने यांना पहिल्या रांगेतच स्थान देण्यात आले होते.

मोदी यांची नजर पडताच त्यांनी हा तुमाचच मतदारसंघ आहे ना ? अशी विचारणा त्यांच्याकडे केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तुमाने यांची दखल घेतल्याने त्यांच्या पुनर्वसनासाठी आता महायुतीवर दडपण आले आहे.

शिवसेनेसाठी रामटेकच्या खासदारकीवर पाणी सोडणारे कृपाल तुमाने यांचे पुनर्वसन केव्हा आणि कधी होणार ? याची चर्चा सध्या रामेटक लोकसभा मतदारसंघात रंगली आहे. त्यांना आमदार म्हणून विधान परिषदेत पाठवण्यात येईल, असेही सांगण्यात येते. त्याचा शब्द त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचे समजते.

Eknath Shinde, Krupal Tumane
Pune Hit And Run Case : 'बाळा'च्या रक्ताचे सॅम्पल बदलण्यासाठी बाहेरील व्यक्ती 'ससून'मध्ये?

युतीत असताना तुमाने यांनी रामटेकचा गड दोन वेळा शिवसेनेला (Shivsena) जिंकून दिला. मुख्यमंत्री शिंदे चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले तेव्हा खासदारांमध्ये तुमाने आघाडीवर होते. त्यांच्यावरच इतर खासदारांना निरोप देण्याची आणि शिंदे सेनेत आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तुमाने महायुतीत आल्यानंतर रामटेकची उमेदवारी सहज मिळेल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, त्यापेक्षा विपरित घडले.

तुमानेंऐवजी काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना महायुतीने रामटेकची उमेदवारी बहाल केली. त्यामुळे त्यांचे नाराज होणे स्वाभविकच होते. ती त्यांनी शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलूनसुद्धा दाखवली. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित होते.

तुमाने यांची समजूत काढताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेत महत्त्वाची जबाबदारी देऊन पुनर्वसन करण्याचे आश्वासन त्यांना दिले. निवडणुकीच्या दरम्यान, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उमेदवारी सोडल्याचा पश्चाताप तुमाने यांना होणार नाही असे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे तुमाने यांना मोठेपद मिळेल हे निश्चित मानले जाते. जागेसंदर्भात वाटाघाटी सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा तुमाने यांना शब्द दिल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 जागा सध्या रिक्त आहेत. याशिवाय विधान परिषदेतील आणखी काही आमदारांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे त्यांना कुठे तरी संधी मिळेल, अशी शक्यता कार्यकर्त्यांना वाटत आहे.

मोदींनी केली विचारपूस

रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे (Raju Parwe) यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्हान येथे सभा घेतली. यावेळी तुमाने यांना पहिल्या रांगेतच स्थान देण्यात आले होते. मोदी यांची नजर पडताच त्यांनी हा तुमाचच मतदारसंघ आहे ना ? अशी विचारणा त्यांच्याकडे केली.

भाषण आटोपल्यानंतरही त्यांनी तुमाने यांच्याजवळ जाऊन बातचित केली. यावेळी शेजारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. थेट मोदी यांनीच तुमाने यांची दखल घेतल्याने त्यांच्या पुनर्वसनासाठी आता महायुतीवर दडपण आले आहे.

(Edited by : Sachin Waghmare)

Eknath Shinde, Krupal Tumane
Krupal Tumane Politics : शिवसेनेचे ‘चाणक्य' रामटेकमध्ये : खासदार तुमानेंची धाकधूक वाढली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com