Ramtek Constituency : शिंदे सेनेसमोर पुनर्वसनाचा पेच! तुमाने की पारवे विधानपरिषदेवर कोणाची वर्णी लागणार?

Krupal Tumane or Raju Parve who will be on the Legislative Council : नागपूरमध्ये माजी खासदार कृपाल तुमाने यांना पुन्हा उमेदवारी देण्यास भाजपने विरोध केला होता. सर्व्हेचा दाखला देऊन उमेदवार बदलण्यास मुख्यमंत्री शिंदे यांना भाग पाडण्यात आलं होतं
Krupal Tumane, Raju Parve,  Eknath Shinde
Krupal Tumane, Raju Parve, Eknath ShindeSarkarnama

Ramtek News, 6 June : रामटेक लोकसभा मतदारसंघातून कोणाचे पुनर्वसन करायचे असा पेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर निर्माण झाला आहे. रामटेक लढण्यासाठी काँग्रेसमधून उमेदवार आयात करण्यात आला होता. तो पराभूत झाला. दुसरीकडे माजी खासदार कृपाल तुमाने यांना थांबवताना विधानपरिषदेचा शब्द देण्यात आला आहे. त्यामुळे आता या दोघांपैकी कोणाची वर्णी विधानपरिषदेवर लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूरमध्ये माजी खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांना पुन्हा उमेदवारी देण्यास भाजपने विरोध केला होता. सर्व्हेचा दाखला देऊन उमेदवार बदलण्यास मुख्यमंत्री शिंदे यांना भाग पाडण्यात आले. त्यांच्याऐवजी भाजपच्या (BJP) सांगण्यावरून उमरेड विधानसभा मतदासंघातील काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना आयात करुन महायुतीकडून राटेकची उमेदवारी देण्यात आली.

या मतदारसंघात महायुतीचे तीन आणि पारवेंसह चार आमदार असताना एकाही मतदारसंघातून महायुतीला मताधिक्य मिळाले नाही. पारवे यांचा नवख्या श्यामकुमार बर्वे यांनी पराभव केला. हा महायुतीपेक्षा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे सेनेत उडी मारल्याने पारवेंचे काँग्रेसमधील दारे बंद झाली आहेत. तर दुसरीकडे शिवसैनिक त्यांना स्वीकारायला तयार नाहीत. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी अवस्था सध्या पारवे यांची झाल्याचं दिसत आहे.

रामटेकमध्ये कृपाल तुमाने खासदार होते. पूर्व विदर्भाचे ते एकमेव लोकप्रतिनिधी होते. पुनर्वसनाच्या चर्चेच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा उपस्थित होते अशी माहिती आहे. मात्र लोकसभेचा उमेदवारच पराभूत झाला आहे. त्यामुळे तुमाने की पारवे यापैकी कोणाचे पुनर्वसन करायचे असा कठीण प्रश्न निर्माण झाला आहे.

Krupal Tumane, Raju Parve,  Eknath Shinde
Bihar CM Nitish Kumar : नितीशबाबूंचे मोदी-शाहांवर प्रेशर; दिल्लीत ‘अग्नी’ भडकणार

भाजपचे फक्त नऊ खासदार निवडूण आले आहेत. पूर्व विदर्भातून नितीन गडकरी हे एकमेव निवडूण आले आहेत. पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आहे. उपमुख्यमंत्रीपद सोडून त्यांनी पक्ष संघटनेत कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी हात झटकले तर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचे सँडविच होणार यात शंका नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com