Rama Phuke addresses the media, slamming Sushma Andhare and Rohini Khadse in connection with the Priya Phuke case.  sarkarnama
विदर्भ

Priya Phuke case : ''सुषमाताई, रोहिणीताईंनी राजकारण करण्यापेक्षा वाद सोडण्यासाठी प्रयत्न केले असते, तर..''

Rama Phuke criticizes Sushma Andhare and Rohini Khadse : आमदार परिणय फुके यांच्या आई रमा फुके यांनी सुनावलं; ''माझी हात जोडून विनंती आहे की, त्यांनीसुद्धा आमच्या सुनेची आणि समाजाची दिशाभूल करू नये.'', असंही म्हणाल्या आहेत.

Rajesh Charpe

Rama Phuke's Reaction in Priya Phuke Case : ''सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे यांनी एका महिलेच्या नात्याने प्रिया फुके यांचे म्हणणे ऐकूण घेतले. तिच्यावर विश्वास ठेवून माध्यमांना माहिती दिली. मी सुद्धा एक महिला आणि आई आहे. माझा कुटुंबावर आरोप करण्यापूर्वी माझीही बाजू समजून घेतली असती, चर्चा केली असती तर तुम्हाला खरी वस्तुस्थिती कळली असती आणि डोळेसुद्धा उघडले असते.'' असे भावनिक आवाहन प्रिया फुके यांच्या सासू आणि आमदार परिणय फुके यांच्या आई रमा फुके यांनी केले.

''मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. आजारी असते. खोट्यानाट्या आरोपांमुळे मला प्रचंड मनःस्ताप झाला आहे. हा कौटुंबिक वाद आहे. त्याला राजकीय वळण देण्याचे कारण नाही.'', असा सल्लाही त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे यांना दिला.

तसेच, ''आमच्या घरगुती वादाबद्दल माझ्या कुटुंबीयांवर केलेले आरोप दुर्दैवी आणि समाजाची दिशाभूल करणारे आहेत. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर काही अधिक बोलणे हा न्यायालयाचा अपमान होईल. पण जेव्हा आमच्या कुटुंबाची बदनामी करण्याचे प्रयत्न केले जातात, तेव्हा त्याबद्दल काही गोष्टी समाजासमोर आणणे आवश्यक आहे. मी माझा तरुण मुलगा गमावला आहे. त्या दुःखातून आम्ही अजूनही बाहेर पडलेलो नाहीत. मुलगा संकेत याचे निधन झाल्यानंतर आम्ही आमची सूनबाई प्रिया आणि दोन्ही नातवंडांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांना कुठल्याही गोष्टीची उणीव जाणवू नये यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत होतो. पण आमच्या नशिबात ते नव्हते.'' असं रमा फुके यांनी सांगितलं आहे.

याशिवाय, ''माझे पती रमेश फुके आजारी असतात. त्यांना दोन्ही नातवंडांना भेटायची इच्छा होते. त्यांनी सुनेला हात जोडून अनेकदा विनंती केली. पण नातवंडांना भेटू दिले जात नाही. काही अटींवर एखादेवेळी भेट घडवून दिली जाते. त्या अटी सांगितल्या तर सर्वांनाच धक्का बसले. प्रिया यांना कोणत्या गोष्टींचा राग आहे, तिला कोणता बदला घ्यायचा आहे, हे अजूनही आम्हाला कळलेले नाही. कुटुंबात एकत्र बसून वाद संपवण्याचे आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. पण दुर्दैवाने आम्ही अपयशी ठरलो.'' असंही रमा फुके म्हणाल्या.

याचबरोबर ''आमच्याकडे प्रत्येक वेळी पैशाची मागणी केली जाते, आम्ही ती पूर्ण सुद्धा करतो. पण आमच्या कुटुंबात शांती राहू नये, असेच प्रयत्न केले जात आहेत. सुषमाताई आणि रोहिणीताई यांनी आमच्या घरातील वाद लोकांसमोर आणून राजकारण करण्यापेक्षा वाद सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते तर अधिक बरे झाले असते. तरुण मुलगा गमावल्यानंतर कोणत्या आई- वडिलांना वाटणार आहे की, त्यांच्या सुनेला आणि नातवंडांना त्रास व्हावा? आमच्या कुटुंबाला सुसंस्कृत घराण्याची परंपरा आहे. आमच्या घरात यापूर्वी असे वाद कधीही झालेले नाहीत.'' असं देखील रमा फुके यांनी बोलून दाखवले आहे.

तसेच, ''आमची सून आणि नातवंड आनंदात आणि सुखात राहावेत, अशी आमची मनापासून इच्छा आहे. त्यासाठी आम्ही सर्वच प्रयत्न आजवर केले. अजूनही तिची समजूत घालण्याचे आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की, त्यांनीसुद्धा आमच्या सुनेची आणि समाजाची दिशाभूल करू नये. आमच्या नातवंडांना सुखात आणि आनंदात ठेवण्यासाठी मदत करावी. किमान छोट्या नातवंडांच्या मनावर या गोष्टींचा किती नकारात्मक मानसिक परिणाम होत असेल याचा तरी या लोकांनी विचार करावा.'' असे विनंतीवजा आवाहन रमा फुके यांनी केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT