Former BJP MP Ramdas Tadas suffers a major setback as his wife loses Devli municipal election, signaling political decline and voter shift in Wardha district. Sarkarnama
विदर्भ

NagarPalika Nikal : CM फडणवीसांचा पैलवान चितपट : भाजपच्या माजी खासदारच्या पत्नीचा पराभव; आधी लोकसभा गेली आता नगरपालिकाही गमावली

Devli Municipal Election : देवळी नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नीचा पराभव झाला. लोकसभेनंतर नगरपालिकाही गमावल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Rajesh Charpe

Devli Election Result : वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना नगरपरिषदेच्या निवडणुकीतही मोठा धक्का बसला. देवळी नगरपालिकेत त्यांच्या पत्नी शोभा तडस यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. येथून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सुरेश वैद्य यांचाही पराभव झाला असून रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे किरण ठाकरे निवडून आले आहेत.

देवळी नगरपरिषदेच्या निकाल ही खासदार अमर काळे आणि माजी खासदार तडस या दोघांसाठी धोक्याची घंटा मानली जाते. देवळीमध्ये भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. खासदार काळे यांनी काँग्रेससोबत आघाडी केली होती. सर्व महत्त्वाच्या जागा खासदार काळे यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्याने मोठा असंतोष निर्माण झाला होता.

माजी खासदार तडस यांचे पुत्र पंकज तडस यांनी प्रमाणापेक्षा या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. याचा फटका दोन्ही आजी-माजी खासदारांना बसला असल्याचे दिसून येते. काँग्रेसचे उमेदवार सुरेश वैद्य हे स्पर्धेतच नव्हते.

याचा फायदा अपक्ष उमेदवार ठाकरे यांना झाला. त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली. शोभा तडस या देवळीच्या यापूर्वी नगराध्यक्ष होत्या. रामदास तडस हे एकेकाळी ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे कट्टर समर्थक होते. काँग्रेसने त्यांचे पुत्र समीर मेघे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. तर भाजपने तडस यांना मैदानात उतरवले होते. त्यामुळे ही निवडणूक फिक्स असल्याचा आरोप केला जात होता. मेघे यांच्याच सांगण्यावरून भाजपने तडस यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जात होते.

मात्र तडस यांनी मेघे यांना पराभूत करून सर्व आरोप व दाव्यांना खोटे ठरवले होते. 2024 च्या निवडणुकीत तडस यांना डावलून सागर मेघे यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न भाजपच्यावतीने करण्यात आले होते. मात्र तडस यांनी समाजाच्या बैठका घेऊन भाजपचा प्रयत्न हाणून पाडला होता. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अमर काळे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत तडस यांना पराभूत केले. आता त्यांच्या पत्नीसुद्धा पराभूत झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT