Buldhana Nagarparishad Election 2025 : बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, या निवडणुकांत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले आहे. अकरापैकी 7 नगरपालिकांमध्ये या 2 राष्ट्रीय पक्षांनी नगराध्यक्षपदे मिळवली आहेत. जिल्ह्यात भाजपने 4, काँग्रेसने 3, शिवसेनेने 1, शिवसेना (उबाठा) 1, राष्ट्रवादी काँग्रेसने 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 1 असे पक्षीय बलाबल स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकांत काही ठिकाणी दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढत रंगली होती. बुलढाणा नगरपालिकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र येथे काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. याच निवडणुकीत बुलढाण्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांनाही धक्का बसला असून, त्यांच्या पत्नीला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.
चिखलीत माजी आमदार व काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या पक्षाचा उमेदवार पराभूत झाला. मलकापूरमध्ये भाजप आमदार चैनसुख संचेती यांचा उमेदवार नगराध्यक्ष होऊ शकला नाही. मेहकरमध्ये शिवसेना खासदार व केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. मात्र मतदारांनी शिवसेना (उबाठा) उमेदवार किशोर गारोळे यांना विजयी करून या दोघांना फटका दिला.
खामगावमध्ये भाजपचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर यांचा विजय झाला. भाजपचे प्रदेश नेते आमदार डॉ. संजय कुटे यांनी जळगाव जामोद नगरपालिका कायम राखली, मात्र शेगावमध्ये त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. एकूणच या निवडणुकांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे स्पष्ट करत काही नेत्यांच्या ताकदीची कसोटी पाहिली आहे.
बुलढाणा- पूजाताई गायकवाड, शिवसेना
चिखली - पंडितराव देशमुख, भाजपा
देऊळगावराजा - माधुरीताई शिपणे, राष्ट्रवादी (अ.प.गट)
सिंदखेडराजा - सौरभ तायडे, राष्ट्रवादी (श.प.गट)
मेहकर - किशोर गारोळे, शिवसेना (उबाठा)
लोणार - मीरा मापारी, काँग्रेस
खामगाव - अपर्णा फुंडकर, भाजपा
शेगाव - प्रकाश शेगोकार, काँग्रेस
जळगाव जामोद - गणेश दांडगे, भाजपा
मलकापूर - अतिक जवारीवाले, काँग्रेस
नांदुरा - मंगलाताई मुरेकर, भाजपा
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.