Abdul Sattar : सिल्लोडमध्ये पुन्हा 'सत्तार' पर्व ! 20 वर्षांची सत्ता अन् मुलाचा राज्याभिषेक; विरोधकांचे मनसुबे धुळीला!

Sillod Election Result : सिल्लोड राजकारणात सत्तार कुटुंबाची 20 वर्षांची सत्ता कायम; मुलाच्या राजकीय उदयानं विरोधकांचे मनसुबे उधळले.
Abdul sattar Court News
Abdul sattar Court NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : गेल्या वीस वर्षापासून सिल्लोड नगर परिषदेवर असलेली एकहाती सत्ता आमदार अब्दुल सत्तार यांनी पुन्हा राखली आहे. विधानसभा निवडणुकीत अवघ्या 2420 मतांनी निवडून आल्यानंतर सत्तार यांची मतदारसंघातील ताकद घडल्याचा दावा केला जात होता. तो त्यांनी मुलाला नगराध्यक्ष करत आणि नगर परिषदेत विरोधकांना 25 विरुद्ध तीन अशा फरकाने धूळ चारत फोल ठरवला आहे. भाजप नेत्यांनी ही निवडणूक नेहमीप्रमाणे गांभीर्याने घेतलीच नव्हती. रावसाहेब दानवे लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढतील ही अपेक्षाही फोल ठरली.

सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांनी कोणत्याच पक्षाशी युती केली नाही. स्वबळावर त्यांनी भाजपला चीत पट केले. महाविकास आघाडी इथे नावालाही नव्हती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काही उमेदवार दिले होते, पण त्यांचे डिपाॅझीट जप्त झाले. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे अब्दुल समीर सत्तार यांच्या विरोधात भाजपने मनोज मोरेल्लू यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा तब्बल 23546 मतांनी पराभव झाला.

अब्दुल समीर यांना 31438 तर भाजपच्या मोरेल्लू यांना 7892 एवढी मते मिळाली.

नगर परिषदेच्या संपूर्ण प्रचारात अब्दुल सत्तार यांना कुठेही टोकाचा विरोध होतोयं असे चित्र दिसले नाही. तरी सत्तार यांनी गाफील न राहता संपूर्ण शहर पिंजून काढले होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांवरच प्रचाराची धुरा होती. जिल्हा किंवा राज्य पातळीवरचा एकही नेता भाजप उमेदवाराच्या प्रचाराला सिल्लोडमध्ये आला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पैठण, खुलताबादसह जिल्ह्यात सभा घेतल्या. पण सत्तार यांच्या सिल्लोडकडे त्यांनीही लक्ष दिले नाही. रावसाहेब दानवे यांनी शेवटच्या टप्प्यात एक सभा घेतली होती.

Abdul sattar Court News
Ajit Pawar shock to BJP : पुण्यात 'ऑपरेशन लोटस'चा फुगा फुटला : अजितदादांनी 'पॉवर' दाखवली; 21 जागांच्या लढतीत भाजपची पिछेहाट

सगळ्याच पक्षांनी नांगी टाकली..

राज्याच्या महायुतीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्येच प्रमुख लढत होती. भाजपने 28 पैकी 22 जागांवर उमेदवार दिले, पण यातील मोजक्या दोन-तीन प्रभागांवरच लक्ष केंद्रीत केले होते. त्या तीन जागाच भाजपला जिंकता आल्या. इतर ठिकाणी त्यांना पराभूतच व्हावे लागले. अब्दुल सत्तार यांनी प्रभागांची केलेली रचना हा विषय नेहमीच चर्चेचा ठरत आला आहे. रावसाहेब दानवे यांनीही सिल्लोडमधील सामाजिक रचना आणि समीकरण याचा दाखला देत भाजपच्या पराभवाची कारणे अनेकवेळा स्पष्ट केली आहे.

Abdul sattar Court News
Meghna Bordikar : जिंतूरमध्ये भाजपचा 'प्रताप'; हायव्होल्टेज लढतीत मंत्री मेघना बोर्डिकरांकडून राष्ट्रवादीचा पराभव

भाजप शिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एमआयएम यांनी हजेरी लावण्यासाठी इथे एक-दोन उमेदवार दिले होते. त्या सगळ्यांचे डिपाॅझीट जप्त झाले आहे. त्यामुळे भाजपसह सगळ्याच पक्षांनी अब्दुल सत्तार यांच्यासमोर नांग्या टाकल्याचे चित्र होते. त्यामुळे लागलेला निकाल हा अपेक्षितच होता. अब्दुल सत्तार यांनी ज्या नगर परिषदेच्या सत्तेतून आपल्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरवात केली, त्याच मार्गाने आता त्यांचे पुत्र समीर सत्तार हे निघाले आहेत. 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तेच सिल्लोड-सोयगावचे उमेदवार असण्याची शक्यता आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com