Ramtek Lok Sabha Election : पूर्व विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत असतो. माजी पंतप्रधान नरसिंहराव, काँग्रेसचे हेविवेट नेते मुकुल वासनिक यांच्यासह अनेक दिग्गजांनी येथून निवडणूक लढवलेली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवार ठरवण्यावरून हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. तो तिढा सुटतो न सुटतो तोच शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पूर्व विदर्भ संघटनप्रमुख सुरेश साखरे यांनी येथून बंडखोरी करण्याचे ठरवले आहे. उद्या (ता. 27) ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघ परंपरागत शिवसेनेचा असताना तो काँग्रेससाठी सोडण्यात आल्याने साखरे यांनी आधीच नाराजी दर्शवली होती. रामटेक हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. कृपाल तुमाने आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते या शिवसैनिकांनी तो प्रत्येकी दोन वेळा जिंकला आहे. विद्यमान खासदार तुमाने हे शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. या मतदारसंघावर पहिला हक्क शिवसेनेचा आहे. आम्ही शिवसेनेच्या नेत्यांना वारंवार रामटेकचा इतिहास सांगितला. कुठल्याही परिस्थितीत हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडू नका अशी विनंती केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मध्यंतरी उद्धव ठाकरे यांची यवतमाळ-वाशीमच्या दौऱ्यावर असताना शे-दीडशे शिवसैनिकांसह भेट घेतली. त्यांच्यासोर रामटेकमधील राजकीय परिस्थिती मांडली. मात्र, वाटाघाटीत महाविकास आघाडीतील काँग्रेससाठी हा मतदारसंघ सोडण्यात आला. त्यामुळे शेकडो शिवसैनिक नाराज झाले आहेत. विशेष म्हणजे सुरेश साखरे बसपाचे प्रदेशाध्यक्ष होते. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेची निवडणूक लढले आहेत. सुमारे पाच वर्षांपूर्वी ते शिवसेनेत दाखल झाले आहेत.
पूर्व विदर्भाचा संघटनप्रमुख या नात्याने रामटेक मतदारसंघात पण निवडणुकीपूर्वी अनेक दौरे केले. संघटन बांधणी केली. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. त्यांचा प्रतिसाद बघूनच आपण येथून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनी फोन केला तरच आपण रिंगणातून माघार घेऊ अन्यथा नाही, असे सुरेश साखरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.