Ramtek MP Shyamkumar Barve Sarkarnama
विदर्भ

NagarPalika Nivdnuk Nikal : काँग्रेसच्या खासदाराने गमावली गावातली नगरपंचायत : घर असलेल्या वॉर्डातही भाजपचा उमेदवार विजयी

Ramtek MP : रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे लोकसभा जिंकूनही आपल्या गावातील कन्हान कांद्री नगरपंचायत राखू शकले नाहीत. भाजपने येथे एकतर्फी विजय मिळवत काँग्रेसला मोठा धक्का दिला.

Rajesh Charpe

Nagpur News : रामटेक लोकसभा मतदारसंघात धक्कादायक विजयाची नोंद करणाऱ्या काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना आपल्या गावातील नगरपंचायत मात्र राखता आली नाही. त्यांचे मूळ गाव असलेल्या कन्हान कांद्री नगरपंचायतमध्ये काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. येथून भाजपचे नगराध्यक्षाचे उमेदवार सुजित पानतावने यांनी मोठा मताच्या फराकने निवडणूक जिंकली आहे.

खासदारांच्या कन्हान कांद्री नगरपंचयातमध्ये भाजपचे 14 तर काँग्रेसचे केवळ तीनच नगरसेवक निवडून आले आहेत. बर्वे यांचे घर ज्या वार्डात आहे तेथेही भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. ही काँग्रेस आणि खासदारासाठी मोठी नामुष्की मानली जाते.

लोकसभेच्या निवडणुकीत श्यामकुमार बर्वे यांचे नाव ऐनवेळी जाहीर करण्यात आले होते. त्यांचा पत्नीला आधी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र जात वैधता प्रमाणपत्राची अडचण आल्याने त्यांच्या ऐवजी श्यामकुमार बर्वे निवडणूक लढले होते. काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांचा अपवाद वगळता सर्वांनी बर्वे यांच्या नावाला विरोध केला होता. मात्र केदार ठाम राहिले. त्यांनी संपूर्ण निवडणूक अंगावर घेतली होती

काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये यांनी यावर नाराजी व्यक्त करून बंडखोरी केली होती. भाजपने माजी खासदार कृपाल तुमाने यांच्या नावाला कडाडून विरोध दर्शवला होता. भाजपने उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना उमेदवारी देण्यासाठी जोर लावला होता.

यात तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आघाडीवर होते. मात्र शिंदे सेनेने ही जागा सोडण्यास नकार दिला होता. शेवटी पारवे उमेदवार आणि चिन्ह धनुष्यबाण यावर महायुतीचे एकमत झाले. एवढे सारे करूनही महायुतीच्या पदरी पराभवच पडला.

श्यामकुमार बर्वे यांनी बावकुळे यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघातून सुमारे 17 हजार मतांची आघाडी घेतली होती. नगर पंचायतच्या निवडणुकीत भाजपने (BJP) या पराभवचा बदला घेतला आहे. खासदारांच्या गावातील नगर पंचयात त्यांच्या हातून हिसकावून घेतली. खासदार होण्यापूर्वी श्यामकुमार बर्वे हे ग्राप पंचयात सदस्य होते. त्यांच्या पत्नी नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT