Raigad Election Result : अलिबाग–महाड–श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी साफ? तटकरेंवर दोन्ही शिवसेनेसह शेकापचा ‘सर्जिकल स्ट्राइक’

Tatkare Vs Gogawale : राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदांसाठी व थेट अध्यक्षपदासाठी मतमोजणी आज होत असून रायगड जिल्ह्यात धक्कादायक निकाल समोर येत आहेत.
Raigad Election Result; Sunil Tatkare, Bharat Gogawale, Uday Samant
Raigad Election Result; Sunil Tatkare, Bharat Gogawale, Uday Samantsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे.

  2. अलिबाग, महाड आणि श्रीवर्धन येथे शिंदेंची शिवसेना व शेकापने राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवले आहे.

  3. निकालानंतर मंत्री भरत गोगावले व उदय सामंत यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे.

Raigad News : रायगड जिल्ह्यात नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांना जोरदार धक्का लागला आहे. येथे अलिबाग, महाड, श्रीवर्धनमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसह शेकापने राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे.

अलिबागमध्ये शेकापने आपला गड राखला असून बाल्ले किल्ला अभेद ठेवला आहे. शेकापनं येथे खेळी खेळत माजी नगराध्यक्ष नाईक यांच्या मुलीला उभे केले होते. त्या अक्षया नाईक विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपच्या तनुजा पेरेकर यांचा पराभव केला आहे.

महाडमध्ये भरत गोगावले यांनी आपला गढ राखत तटकरे यांना जोरदार धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वीच येथे जोरदार राडा झाला होता. तर या राड्यात गोगावलेंच्या मुलावर बंदूक रोखण्यात आली होती. यानंतर आज लागलेल्या निकालात शिंदेंच्या शिवसेनेनं विजयाचा झेंडा फडकावला आहे. येथे शिवसेनेचे सुनील कविसकर विजयी झाले असून त्यांनी सुदेश कळमकर यांचा पराभव केला आहे. तर पेणमध्ये भाजपच्या प्रितम पाटील आणि रोह्यात राष्ट्रवादीच्या वनश्री शेडगे यांचा विजय झाला आहे.

Raigad Election Result; Sunil Tatkare, Bharat Gogawale, Uday Samant
Gogawale Vs Tatkare : रायगडमधील संघर्षात नवा ट्विस्ट! कार्यकर्ते हमरी-तुमरीवर, मात्र मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे मंचावर एकत्र

दरम्यान श्रीवर्धनमध्ये देखील तटकरे यांना फटका बसला असून येथे ठाकरेंच्या शिवसेनेचे अतुल चौगले विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र सातनाक यांचा अनपेक्षित पराभव झाला आहे. श्रीवर्धन हा मंत्री आदिती तटकरे यांचा विधानसभा मतदार संघ आहे.

यादरम्यान भरत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी जनतेनं दिलेल्या कौलाबद्दल आभार मानले आहे. त्यांनी, हा विजय निश्चित होता फक्त किती फरकाने होणारे एवढाच प्रश्न होता. पण काही उमेदवारांचा थोड्या फरकाने पराभव झाला जो जिव्हाळी लागल्याचे म्हटलं आहे.

पण महाडकरांनी आम्हाला विजयी केलं. तसेच येथे जो चमत्कार झाला तो गरजेचा होता असे म्हणत तटकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून वीरेश्वरांना नमस्कार करून आम्ही श्रीवर्धनच्या दिशेने रवाना होणार असून हा चमत्कार ठाकरेंच्या शिवसेनेनंसोबत हातमिळवणी केल्याची कबुली त्यांनी अस्पष्ट दिली आहे.

तसेच त्यांनी आपण गनिमी कावा आणि युक्ती वापरल्याचे सांगत तटकरेंनी दुसऱ्याच्या भांड्यात डोकावून पाहण्याआधी आपले भांडे स्वच्छ आहे का हे पाहायला हवं होतं असाही टोला लगावला आहे. रत्नागिरीत देखील शिंदेंच्या शिवसेनेनं विजयी वाटचाल केल्यावरून पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी रायगडच्या विजयावर बोलताना आता कोणी गोगावलेंच्या नॅपकीनवर थटा करणार नाही, असे सुनावले आहे.

Raigad Election Result; Sunil Tatkare, Bharat Gogawale, Uday Samant
Tatkare Vs Gogawale : भरत गोगावलेंचा तटकरेंवर गंभीर आरोप; ‘शिवसेनेच्या आमदारांना पाडण्यासाठी सेटलमेंट...’

FAQs :

1. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला पराभव का सहन करावा लागला?
स्थानिक पातळीवर शिंदे शिवसेना व शेकापची मजबूत संघटनात्मक ताकद आणि आघाडी यामुळे राष्ट्रवादी पिछाडीवर पडली.

2. कोणत्या शहरांत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला?
अलिबाग, महाड आणि श्रीवर्धन या प्रमुख ठिकाणी राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला.

3. या निकालांचा अजित पवार गटावर काय परिणाम होईल?
हे निकाल आगामी विधानसभा आणि लोकसभा राजकारणासाठी इशाराच मानले जात आहेत.

4. शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली?
मंत्री भरत गोगावले आणि उदय सामंत यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली.

5. शेकापची भूमिका या निवडणुकीत काय होती?
शेकापने शिवसेना (शिंदे गट) सोबत युती करून राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com