Buldhana District News : फसवणूक करणाऱ्या गाडे बंधूंबाबत आम्ही सहायक उपनिबंधक, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच बाजार समितीकडे तक्रार केलेली आहे. सदर व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी व त्यांची संपत्ती विकून शेतकऱ्यांना पैसे द्यावे, अशी मागणी आहे. परंतु याप्रकरणी सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण करत असल्याचा घणाघाती आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. (Farmers should be paid by selling trader's property)
शेतकऱ्यांना मदत करायची सोडून रविकांत तुपकर यांना टार्गेट करून त्यांची प्रतिमा मलीन करायचा हा डाव आहे. शेतकऱ्यांमध्ये वाढती लोकप्रियता आणि येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन विनाकारण चुकीचे आरोप करत राजकारण करण्याचा हा डाव आहे, असेही तुपकर म्हणाले. तसेच मेहकर येथील दोन व्यापारी शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे पैसे घेऊन पसार झाले आहेत, त्यांच्या विरोधात मेहकरचे लोकप्रतिनिधी का बोलायला तयार नाहीत, असा प्रश्नही त्यांनी केला.
रविकांत तुपकर यांनी आज शेतकऱ्यांसह पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात बाजू मांडली. अॅड. अशोक सावजी हे ज्येष्ठ विधीज्ञ आहे. त्यांच्या कार्यालयात बरेच वकील काम करतात, त्यामध्ये माझी पत्नी अॅड. शर्वरी तुपकर देखील आहे. संबंधित व्यापाऱ्याचे सासरे काही वर्षापूर्वी अॅड. सावजी यांच्याकडे कारकून होते, या संबंधातून हे व्यापारी त्यांच्याकडे गेले होते, परंतु हे प्रकरण शेतकऱ्यांचे असल्याचे लक्षात येताच आम्ही त्यांना ही केस घेऊ नये अशी विनंती केली आणि त्यांनी सदर केस परत केली.
आता या केसमध्ये दुसरे वकील आहेत त्यामुळे विनाकारण आमचे नाव पुढे करुन राजकारण (Politics) केले जात आहे. या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा हा प्रकार सुरु आहे. शिवसेना-शिंदे (Eknath Shinde) गटाचे गजानन मोरे यांना आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही. पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर आरोप करणारे गजानन मोरे यांनी त्यांच्या संस्थेत बोगस विद्यार्थी दाखवून ६५ लाखांची शिष्यवृत्ती लाटली होती. शासनाने (Government) याप्रकरणी कारवाई करुन सदर रक्कम वसूल केली आहे. २०११ मध्ये गजानन यांच्यासह संस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत.
राऊत नावाच्या शिक्षकाला त्यांनी काढुन टाकले होते, तेव्हा त्या शिक्षकाने हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने सदर शिक्षकाला शाळेत घेण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी सदर शिक्षकास पुन्हा शाळेत घेतले होते. तसेच मोरे यांनी दिवठाणा येथील ग्रामपंचायतीच्या दोन खोल्या आणि दोन एकर जमिन बळकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा अॅड. शर्वरी तुपकर यांनी त्यांच्या विरोधात केस लढून ग्रामपंचायतीला विजय मिळवून दिला होता.
त्यामुळे मोरे यांना संस्थेसाठी दोन खोल्या आणि दोन एकर जमीन पचवता आली नाही. त्याचा राग असल्याने ते चुकीचे आरोप करीत आहेत, मुळात गजानन मोरे यांना आरोप करण्याचा कोणताच नैतीक अधिकार नाही, असे तुपकरांनी (Ravikant Tupkar) सांगितले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.