Ravikant Tupkar : एल्गार मोर्चाच्या माध्यमातून सोयाबीन (Soybean) कापसाचे आंदोलन महाराष्ट्रावर पेटवणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी सिंदखेड राजा येथील पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापसाचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. थोड्याप्रमाणात जे पीक शेतकऱ्यांच्या हातामध्ये येईल त्याला भाव नाही, असा आरोप तुपकर यांनी केला.
नुकसान झालेल्या शेतीचे अजूनपर्यंत पंचनामे शासनाने केलेले नाहीत. नुकसान भरपाई मिळालीच नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मदत दिल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षामध्ये मदत शेतकऱ्यांनापर्यंत पोहोचली नसल्याचे त्यांनी सांगितले. नुकसानग्रस्ताना एकरी ५० हजार रुपये भरपाई विनाअट, विनाशर्त मिळाली पाहिजे त्यामध्ये कुठली मर्यादा घालू नका. सोयाबीनचे जे दर पडलेले आहेत, यावर्षी सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढलेला आहे, म्हणून सोयाबीनला एक क्विंटल सहा हजार रुपये उत्पादन खर्च लागतो. उत्पादन खर्चाच्या ५० टक्के नफा म्हणजे साडे आठ हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
आम्ही भाव द्या असे म्हणत नाही बाजारातला भाव स्थिर करा, असे आमचे म्हणणे आहे. कापसाचा भाव सात ते साडे सात हजार प्रति क्विंटल आहे. तो कापसाचा भाव प्रतिक्विंटल कापसाला आठ ते साडे आठ हजार रुपये उत्पादन खर्च आहे. एक क्विंटल कापसाला तर तो उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा या सूत्रानुसार साडेबारा हजार रुपये भाव कापसाला मिळाला पाहिजे असेही ते म्हणाले.
६ नोव्हेंबर पासून बुलडाण्यातून एल्गार मोर्चा काढणार आहेत. मोर्चा भूतो न भविष्यती असेल केंद्र आणि राज्य सरकारला धडकी भरवणारा मोर्चा असेल. सरकार हादरवणारा हा मोर्चा असेल, असेही तुपकर यांनी सांगितले. रविकांत तुपकर हे जिल्ह्यातील गावा गावांमध्ये सध्या फिरत आहेत.
स्वतः एल्गार मोर्चाची पार्श्वभूमी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. त्यांच्या या मोर्चाला महिला युवक व शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळत आहे. विदर्भामध्ये एका रात्रीत १५-१५ शेतकरी आत्महत्या होत आहे. इतकी वाईट अवस्था सध्या आहे. आपल्या भागातल्या शेतकऱ्यावर सुद्धा आत्महत्येची वेळ आलेली आहे, असेही तुपकर यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचा आणि दुधाचे आंदोलन आक्रमक होते. त्यांच पद्धतीने सोयाबीन कापसाचे आंदोलन या वर्षी सबंध महाराष्ट्रमध्ये पेटवणार आहोत. पक्षाचे जोडे बाजूला ठेवून शेतकरी म्हणून लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तारीख सहा नोव्हेंबरच्या एल्गार मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हायचे. सरकारच्या छाताडावर बसून सोयाबीन कापसाला भाव नुकसान भरपाई, पिक विम्याचा प्रश्न, जंगली जनावरांचा प्रचंड त्रास असे सगळे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीला कंपाऊंड करून द्या ही मागणी केली. यावेळी त्यांच्या सोबत चिंचोली सरपंच भगवान पालवे, मधुकर शिंगणे, गणेश शिंगणे, विजय राठोड, गजानन चव्हाण, विकास उगले, सहदेव लाड यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.