Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis : अनिल देशमुख निर्णयापर्यंत पोचले? फडणवीसांच्या विरोधात लढण्यावर मोठं भाष्य

Rajesh Charpe

Nagpur News : माजी गृहमंत्री अनिल देशमुख कुठल्या मतदारसंघातून लढणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये सुरू असलेला वाद हा त्यासाठी उकरून काढण्यात आल्याचा तर्क काढला जात आहे. आज या संदर्भात अनिल देशमुख यांना विचारणा करण्यात आली. ते म्हणाले, "पक्षात निर्णय मी एकटा घेत नाही. जे पक्ष ठरवले त्यानुसार निवडणूक लढू", असे सांगून त्यांनी थेट यावर उत्तर देण्याचे टाळले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा गृहजिल्हा असलेल्या गोंदिया-भंडारा येथील तीन विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष दावा करणार आहे. या तीनही जागा आमच्या आहेत. त्या आम्ही मागणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते तसेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

अनिल देशमुख भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. आघाडीमध्ये या तीनही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) लढत होती. मात्र येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आता अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. असे असले तरी या तीनही जागावर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा जिल्हा आहे. खासदार प्रशांत पडोळे येथून निवडूण आलेत. नाना पटोले यांनी त्यांना निवडूण आणण्यासाठी सर्व जबाबदारी घेतली होती. हे बघता यातीनही विधानसभेच्या जागेवार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशमुख यांनी यावेळी महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस' झाले तेव्हा 50 कोटी देऊन आमदार फोडून सरकार पाडले, असा आरोप केला.

सध्या कर्नाटकमध्ये भाव 100 कोटींवर केला आहे. तेथील सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपच्यावतीने केला जात आहे. भाजपने आधी शिवसेना फोडली. त्यानंतर राष्ट्रवादी फोडला. अनेक आमदार भीतीमुळे महायुतीत गेले आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडवार यापैकी अनेक आमदार परत येथील, असाही दावा अनिल देशमुख यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT