Mumbai News : राज्यात विधानसभा निवणुडका यंदा वेगळ्याच पातळीवर होणार असल्याचे संकेत आहेत. एकमेकांची जिरवा-जिरव या निवडणुकीत होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. अशीच एक अटीतटीच्या लढतीची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप बालेकिल्ला असलेल्या नागपुरातील दक्षिण-पश्चिम मतदारसंघात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार अनिल देशमुख रिंगणात उतरण्याच्या हालचाली सुरू आहेत. फडणवीस-देशमुख लढतीची सध्या नागपुरासह राज्यात चर्चा रंगली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होतील, असे संकेत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांकडून आताच चाचपणी सुरू आहे. राज्याच्या सत्तेतील महायुती सरकारने वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोचण्यास सुरवात केली आहे. महाविकास आघाडीने देखील यात मागे नाही. दोघेही प्रत्येक मतदारसंघात एकमेकांचा अंदाज घेत आहेत. यातच भाजपचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरात विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष वेगळ्याच राजकीय मूडमध्ये दिसतो आहे. भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविरूद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे नेते आमदार अनिल देशमुख यांच्यात नागपुरात लढत होण्याची चर्चा रंगली आहे. असे झाल्या गृहमंत्रीविरुद्ध माजी गृहमंत्री असा सामना होईल. परंतु या सर्व चर्चा आहेत, उमेदवारीबाबत मला काहीच माहिती नाही, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांची प्रतिक्रिया समोर येते.
नागपूर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे मुख्यालय. त्यामुळे नागपूर हा भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. देवेंद्र फडणवीस नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात यावेळी मैदानात काटोल मतदारसंघातून पाच वेळा निवडून आलेले अनिल देशमुख असतील, अशी चर्चा आहेत. तशी चाचपणी सुरू असल्याचे बोलले जाते. परंतु अनिल देशमुख काटोल मतदारसंघातूनच लढतील, असे देखील सांगितले जाते.
महाविकास आघाडीचे सरकार असताना अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्री पद होते. महाविकास आघाडीचे सरकार गेले आणि महायुतीचे सरकार आले. त्यावेळी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप झाले. मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीरसिंह यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले. त्यानंतर अनिल देशमुख यांना तुरुंगात जावे लागले. यावरून देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्यात आजही आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हे दोघे आमने-सामने आल्यावर 'कांटे की टक्कर', अशी लढाई होईल, अशी चर्चा आहे.
नागपूर शहरातील सहा मतदारसंघासह देवेंद्र फडणवीस लढत असलेल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे आहे. मात्र काँग्रेसला 2009 पासून एकदाही विजय मिळवता आलेला नाही. परंतु नागपूर शहरातील विधानसभेच्या सहा जागा काँग्रेसकडे असून, काँग्रेसच लढेल, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.