Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेत गोंधळ घालण्याच्या प्रयत्न, सगळ्यांनाच हाॅल बाहेर काढले

Raj Thackeray Mns meeting Attempts to disrupt : बुलढाण्यात आपण निवडणूक लढली पाहिजे की नाही हे जाणून घेण्यासाठी मी येथे आलो आहे, ज्याच्या नावाने जोरात घोषणात देताय त्याचे तिकीट कन्फर्म आहे, असे समजू नका. असे राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. बुलढाण्यात राज ठाकरे बोलण्यासाठी उभे राहिले असता या सभेत आलेल्या तरुणाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. गोंधळ घालणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी बाजुले नेले.

या गोंधळानंतर राज ठाकरे म्हणाले, मी येथे भाषण करायला आलो नाही. हा काही माझा संवाद दौरा नाही. विधानसभा निवडणुकीसाठी हा माझा चाचपणी दौरा आहे.

'बुलढाण्यात आपण निवडणूक लढली पाहिजे की नाही हे जाणून घेण्यासाठी मी येथे आलो आहे. तुमचा सर्वांचा उत्साह समजू शकतो. त्यासाठी काही काम करायला लागलं. ते करण्यासाठी मी येथे आलो आहे.', असे राज ठाकरे यांनी सांगत हाॅलमधून सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले. फक्त मनसेचे जिल्हाधिकारी, तालुकाधिकारी, मनसेचे विद्यार्थी सेना आणि इतर आघाड्यांच्या प्रमुखांनी येथे थांबवे. मला त्यांच्याशी चर्चा करायची आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
Aditya Thackeray : केंद्रातील भाजप सरकारच्या 'फायनान्स मॉडेल'वर आदित्य ठाकरेंचे फटकारे

सभेत घोषणा आणि गोंधळ घालणाऱ्या तरुणाने गोंधळ का घातला, याचे कारण समजू शकले नाही. मात्र, गोंधळ घालणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तिकीट कन्फर्म समजू नका

तुम्ही कोणाच्या नावाच्या घोषणा जोरात दिल्या म्हणजे त्याचे तिकीट कन्फर्म झाले असे समजू नका. जेवढ्या जोरात घोषणा द्याल तेवढे त्याचे तिकीट कापण्याचे शक्यता जास्त, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

चंद्रपुरच्या सभेत राडा

राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी ते चंद्रपूरमध्ये होते. तेथे त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मात्र, राज ठाकरे तेथून गेल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच तेथे मनसेच्या दोन गटांमध्ये तिकीटावरू राडा झाला. मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये मारमारी झाल्याचा व्हिडिओ देखीळ व्हायरल झाला होता.

Raj Thackeray
Assembly Election : अयोध्येत विजय मिळवणारे अवधेश प्रसाद भाजपला पुन्हा धूळ चारणार; अखिलेश यांची रणनीती...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com