Nagpur, 13 June : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे नोटीफिकशन निघाले आहे, त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महायुती आणि आघाडीमध्ये जागा वाटपाच्या वाटाघाटी, चर्चेला सुरुवात झाली आहे. मोठ्या पक्षांमुळे रिपब्लिकन पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यास आणखी बरेच कारणे आहेत. या सर्व धबडग्यात महापालिकेत आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी संयुक्त रिपब्लिकन आघाडीने 2007 चा फॉर्म्युला वापरण्याचे ठरवले. मात्र त्यावेळी एक सदस्यीय पद्धत होती, त्यामुळे हा प्रयोग कितपत यशस्वी होतो, हे निकालानंतरच दिसून कळणार आहे.
संयुक्त रिपब्लिकन आघाडीचे नेते अमृत गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन पक्षाचे नागपुरातील गटप्रमुख दिनेश गोडघाटे, प्रकाश कुंभे, प्रा. प्रदीप बोरकर, बाळू मामा कोसमकर, राज सुखदेवे, शेषराव गणवीर, प्रा. बुद्धराज मून, सोनू पाटील, कृष्णा पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी नुकतीच एक बैठक घेतली. त्यात महापालिका निवडणुकीत 2007 चा आघाडीचा फॉर्म्युला वापरण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
महापालिकेच्या 2007 च्या निवडणुकीत रिपब्लिकन आघाडीचे 09 नगरसेवक निवडून आले होते. निवडणूक झाल्यानंतर पुन्हा आघाडीत बिघाडी झाली होती. अनेकांनी आपल्या सोयीचे निर्णय घेतले होते आणि पक्ष निवडले होते. आज रिपब्लिकन कार्यकर्ते आणि नेते वेगवेळ्या पक्षात आहेत. काहींनी सत्तेसोबत जाण्याचा मार्ग निवडला, त्यामुळे आघाडी फुटली होती, त्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व कमी झाले होते.
बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे रिपब्लिकन आघाडीचे नुकसान झाले होते. याच कारणामुळे अनेकांनी भाजप आणि काँग्रेसमध्ये शिरकाव केला. त्यांनी आपले वैयक्तिक अस्तित्व कायम ठेवले. चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीचा सर्वाधिक फायदा भाजपला झाला आहे. भाजपचे १०८ नगरसेवक 2017 च्या निवडणुकीत निवडून आले होते.
केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने भाजप आणखीच पॉवरफूल झाली आहे. प्रचार आणि प्रसारातही भाजप आघाडीवर आहे. प्रत्येक उमेदवाराला पक्षामार्फत सर्वच प्रकारची मदत दिली जाते.
दुसरीकडे काँग्रेस मोठा पक्ष आहे. त्यांचे २९ नगरसेवक निवडून आले होते. नागपूर शहरात काँग्रेसचे दोन आमदार आहेत. त्यांची पाळेमुळे अद्यापही रुजलेली आहेत. अशा परिस्थितीत रिपब्लिकन आघाडीला दोन बलाढ्य पक्षाच्या विरोधात लढावे लागणार आहे. हे लक्षात घेऊन महापालिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या विविध घटक पक्षांसह भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, शासकीय निमशासकीय व कामगार संघटना यांच्यासोबत समविचारी राजकीय पक्षांना संयुक्त रिपब्लिकन आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.