Satej Patil News : Dhananjay Mahadik
Kolhapur Politics : Satej Patil News : Dhananjay Mahadik News Sarkarnama

Kolhapur politics update: बंटींनी ज्यांच्याशी सोयरिक केली तेच यंदा विरोधात; जे होते मुन्नाच्या विरोधात ते येणार एकत्र !

Satej Patil political shift News: कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना झाली.
Published on

Kolhapur News : राज्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याआधी ९ वर्षांपूर्वी कोल्हापुरात महाविकास आघाडीचा जन्म झाला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना झाली. त्यानंतर महापालिकेवर सत्ता स्थापन केली. भाजप आणि महाडिक यांच्या ताराराणी आघाडीला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील एकत्र आले.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महायुती म्हणून मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना महापालिकेत एकत्र यावे लागणार आहे. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांपूर्वी ज्यांची राजकीय सोयरीक आमदार सतेज पाटील यांनी केली. त्याच मंत्री मुश्रीफ आणि क्षीरसागर यांच्या विरोधात महापालिकेच्या निवडणुकीत लढावे लागणार आहे.

2016 साली झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना (Shivsena) एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. त्यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसचे 30, राष्ट्रवादीचे 15, शिवसेना 4, ताराराणी आघाडी 19 आणि भाजपचे 14 असे संख्याबळ होते. भाजप आणि ताराराणी आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ एकत्र आले होते.

Satej Patil News : Dhananjay Mahadik
Ahmedabad Air Plane Crash : विमान अपघातातील मृतांचा नेमका आकडा किती? 'ते' 24 डाॅक्टरही...

त्यावेळी स्थानिक राजकारणाचा अंदाज घेत शिवसेनेला देखील सोबत घेऊन महापालिकेत सत्ता स्थापन केली. त्यावेळी ताराराणी आघाडी व भाजपकडून (BJP) राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली होती. सध्या गेल्या चार वर्षांपासून कोल्हापूर महानगरपालिकेवर प्रशासकराज सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील राजकीय समीकरणे बदललेली आहेत.

Satej Patil News : Dhananjay Mahadik
Raj Thackeray On Plane Crash : अहमदाबादमधील विमान अपघातनंतर राज ठाकरेंनी 'ड्रीमलाईनर'ची कुंडलीच मांडली; पुरावे देत म्हणाले, 'अनेक तक्रारी...'

गेल्या पाच वर्षांत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षात फूट पडली. शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले. कोल्हापूर महानगरपालिकेतील बहुतांश राष्ट्रवादी ही मंत्री मुश्रीफ यांच्या सोबत आहे. तर शिवसेनेतील सध्या दोन नगरसेवक क्षीरसागर यांच्यासोबत आहेत. वरिष्ठ स्तरावरून कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ही महायुती म्हणून लढावी, असा सूचना सध्या तरी आहेत.

Satej Patil News : Dhananjay Mahadik
Bachchu Kadu Politics: बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर!

त्यामुळे मंत्री मुश्रीफ आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबतच राहावे लागणार आहे. सध्या एकसंघ लढावे की स्वतंत्र लढावे, अशी चर्चा झाली नसली तरी महायुती म्हणून तिघांनाच एकत्र निर्णय घ्यावे लागणार आहेत. तर यापूर्वी सतेज पाटील, मुश्रीफ आणि क्षीरसागर एकत्र दिसले. तेच मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्याची शक्यता सध्या तरी दिसते.

Satej Patil News : Dhananjay Mahadik
Anil Deshmukh : प्रभाग रचनेचे नोटिफिकेशन तरी अनिल देशमुख म्हणतात, 'निवडणूक होईलच याची गॅरंटी नाही'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com