Ajit Pawar | Sharad Pawar | Rohit Pawar sarkaranama
विदर्भ

Rohit Pawar News : अजित पवारांनी जर 'तो' निर्णय घेतला, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार...! रोहित पवारांचं मोठं विधान

Rohit Pawar On NCP : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आणि मराठीच्या मुद्द्यांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दोन-दोन पावलं माघार घेत युतीचे संकेत दिले आहेत. यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Deepak Kulkarni

Bhandara News :आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच धर्तीवर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आणि मराठीच्या मुद्द्यांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दोन-दोन पावलं माघार घेत युतीचे संकेत दिले आहेत. यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बुधवारी(ता.13) मीडियाशी संवाद साधताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावरुन मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले,अजित पवारांनी भाजपची साथ सोडली तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं म्हटलं आहे.

रोहित पवार म्हणाले, आम्ही भाजपच्या विरोधात आहोत, त्यांच्या विचारसरणीविरोधात आहोत. त्यामुळे, जर अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपची साथ सोडली आणि शरद पवार साहेबांसोबत पुरोगामी विचारासोबत ते आले तर आम्ही त्यांचा विचार करू असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.

अजित पवार भाजपसोबत असतील तर आम्ही एकत्र येऊच शकत नाही. जर त्यांनी भाजपला सोडलं तर सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण काय करायचं तो विचार केला जाईल, असंही रोहित पवार यांनी म्हटलं.

मतांची चोरी पकडी गई, राहुल गांधींनी उघड उघड पुराव्यानिशी मतांची चोरी झाल्याचं प्रेस कॉन्फरन्समधून जाहीर केलं आहे. आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत, टप्प्याटप्प्याने समोर येणार आहोत. मतांची चोरी म्हणजेच लोकशाहीची चोरी असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

यावेळी रोहित पवारांनी मतांची चोरी झाली आहे, याचे आमच्याकडेही पुरावे असून, येत्या काळात आम्ही ते समोर आणणार असल्याचा इशाराही दिला. तसेच लोकशाहीची चोरी होत असेल तर, गरिबांना न्याय देता येणार नसल्याचं विधानही त्यांनी केलं.

गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीतील काही नेते हे सातत्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, असे संकेत देणारी वक्तव्य करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै 2023 मध्ये खासदार शरद पवारांच्या भूमिकेशी फारकत घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावरुन दोन्ही पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली असून मोठ्या संख्येने आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत. सध्या ते आमदार सत्तेत असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आणखी काही नेते त्यांची साथ सोडत आहेत. लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक देखील दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढली होती.

त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या एकमेकांशी गाठीभेटीही सुरु होत्या. शरद पवार आणि अजित पवार हे विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं यापूर्वी अनेकदा एकत्र आल्याचं देखील दिसून आलं होतं. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असं काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी यांनी म्हटलं होतं. या त्यांच्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT