Anil Deshmukh and Salil Deshmukh Sarkarnama
विदर्भ

NCP and Katol Assembly Constituency : काटोलवरून पवार गटातील पेच संपला, सलील देशमुखांचा मोर्चा मोर्शीकडे?

Rajesh Charpe

NCP Sharad Chandra Pawar Party News : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे पुत्र सलील देशमुख यांनी काटोल-नरखेड या एकाच विधानसभा मतदार संघावर दावा ठोकला होता. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण झाली होती. आता सलील यांनी आपला मोर्चा मोर्शी विधानसभा मतदारसंघाकडे वळवल्याने यातून आता तोडगा निघण्याचे चिन्ह दिसू लागली आहेत. प्रत्येक निवडणुकीत नवा आमदार देण्याची परंपरा असलेले मोर्शीकर त्यांचे कसे स्वागत करतात हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

अनिल देशमुख(Anil Deshmukh) सुमारे २५ वर्षांपासून काटोल-नरखेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. सर्वप्रथम ते अपक्ष निवडून आले होते. १९९५ मध्ये महायुतीचे सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर ते त्यांच्यासोबत गेले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात ते १४ वर्षे कॅबिनेट मंत्री होते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना गृह हे मोठे व महत्त्वाचे खाते देण्यात आले होते.

त्यांच्या पाठोपाठ सलील देशमुख हेसुद्धा राजकारणात सक्रिय झाले आहेत.सध्या नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. आता ते विधानसभेची निवडणूक लढण्यास ते इच्छुक आहेत. मात्र मतदारसंघाची अडचण होती. सुरुवातीला त्यांना काटोलवर दावा केला होता. शरद पवार(Sharad Pawar) यांची भेट घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे अनिल देशमुख की सलील देशमुख असा पेच निर्माण झाला होता.

अनिल देशमुख यांनीसुद्धा त्यांच्या नावाला विरोध केला नाही. मात्र ते कुठल्या मतदारसंघातून लढणार हे गुपित ठेवले होते.याकरिता वेगवेगळ्या मतदारसंघात सलील देशमुख यांची चाचपणी सुरू होती. मोर्शी विधानसभा मतदारसंघ काटोल मतदारसंघाला लागून आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघात मोर्शी येते. अमर काळे हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. अमर काळे आणि सलील देशमुख हे एकमेकांचे मामेभाऊ, आतेभाऊ आहेत. सध्या देवेंद्र भुयार हे मोर्शीचे आमदार आहेत. सध्या ते अजित पवार(Ajit Pawar) यांच्या जवळ आहेत. भाजपचाही या मतदारसंघावर दावा आहे. हे बघता राष्ट्रवादी व भाजपमध्ये येथे रस्सीखेच सुरू आहे. या परिस्थितीत पक्षाने सांगितल्यास आपली कुठल्याही मतदारसंघातून लढण्याची तयारी असल्याचे सलील देशमुख यांनी सांगून आपला दावा अधिक पक्का केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT