CBI case against Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आणखी गुन्हा दाखल केला आहे. भाजप नेते गिरीष महाजन यांना एका गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलीस अधिक्षकांवर दबाव टाकल्याचा अनिल देशमुखांवर आरोप आहे. तर CBIकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर ट्वीटद्वारे निशाणा साधला आहे.
अनिल देशमुख(Anil Deshmukh) म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपुर्वीची घटना उकरून काढीत माझ्या विरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे. चार वर्षापुर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाजन यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे.'
परंतु 'माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकुन मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी((Devendra Fadnavis)) दिल्लीच्या मदतीने ED-CBI ला हाताशी धरून महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले त्यांना सांगु इच्छितो की, देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे.' अशा शब्दांत फडणवीसांना अनिल देशमुखांनी आव्हान दिलं आहे.
या आधी देखील अनिल देशमुखांनी फडणवीसांवर यावरूनच टीका केली होती. तेव्हा अनिल देशमुख म्हणाले होते. 'धन्यवाद. देवेंद्रजी फडणवीस, माझ्यावर CBIकडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता- न डगमगता मी BJPच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे.'
तसेच 'महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे.!' अशा शब्दांत अनिल देशमुखांनी निशाणा साधला होता.
दरम्यान, जळगावचे तत्कालीन पोलिस अधिक्षक प्रवीण मुंढे यांच्या जबाबामध्ये देशमुखांनी धमकावल्याचा उल्लेख आहे. त्याआधारे सीबीआयने देशमुकांवर आरोपी केले आहे. या गुन्ह्यात तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हेही आरोपी आहेत.
(Edite by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.