Chitra Wagh Vs Anil Deshmukh : '...हा तर आता महाराष्ट्रात पायंडाच पडला आहे' ; चित्रा वाघ यांचं अनिल देशमुखांना प्रत्त्युत्तर!

Chitra Wagh Criticized on Anil deshmukh : सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला, ज्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पलटवार केला आहे.
Chitra Wagh Vs Anil Deshmukh
Chitra Wagh Vs Anil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

BJP Chitra Wagh News : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. सीबीआयने त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांना एका गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिस अधिक्षकांवर दबाव टाकल्याचा देशमुखांवर आरोप आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यासमोरी अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत. आता त्यांच्याविरोधात सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांना एका गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलीस अधिक्षकांवर दबाव टाकल्याचा अनिल देशमुखांवर आरोप आहे. तर CBIकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर ट्वीटद्वारे निशाणा साधला. ज्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Chitra Wagh Vs Anil Deshmukh
Anil Deshmukh : विकृत मानसिकता म्हणत अनिल देशमुखांनी मानले फडणवीसांचे आभार; काय आहे प्रकरण?

चित्रा वाघ(Chitra Wagh) म्हणाल्या, 'अनिलबाबू , 100 कोटींची वसुली मनसुख हिरेनची हत्या, लादेन उर्फ वाझे, हेही तेव्हा तुम्ही तथ्यहिनच म्हणाला होतात ना…? राज्यात गुंतवणूकच येऊ नये…म्हणून उद्योगपतींच्या घरांसमोर स्फोटके पेरण्याचे काम कोण करीत होते…हे विकृत आणि घाणेरडे राजकारण कोण करीत होते..? थेट महाराष्ट्राच्या अस्मितेशी गद्दारी कोण करीत होते…?'

तसेच, 'पापं करायची आणि काही झाले की आमच्या नेत्याचे नाव घ्यायचे, हा तर आता महाराष्ट्रात पायंडाच पडला आहे. निवडणुकीत दोन हात होऊनच जाऊ द्या, यंदा जनता तुम्हाला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही…!' अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी अनिल देशमुखांवर पलटवार केला आहे.

अनिल देशमुख काय म्हणाले आहेत? -

अनिल देशमुख(Anil deshmukh) देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले, 'धन्यवाद... देवेंद्रजी फडणवीस. माझ्यावर CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता - न डगमगता मी BJPच्या या दडपशाहीविरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे.'

Chitra Wagh Vs Anil Deshmukh
Anil Deshmukh : अनिल देशमुखांना मोठा धक्का; CBI कडून गुन्हा दाखल, पुन्हा जेलमध्ये जावे लागणार?

तसेच 'महाराष्ट्रात फडणवीसांकडून(Devendra Fadnavis) किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे, ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे.!' असंही अनिल देशमुखांनी म्हटलेलं आहे.

दरम्यान, जळगावचे तत्कालीन पोलिस अधिक्षक प्रवीण मुंढे यांच्या जबाबामध्ये देशमुखांनी धमकावल्याचा उल्लेख आहे. त्याआधारे सीबीआयने देशमुकांवर आरोपी केले आहे. या गुन्ह्यात तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हेही आरोपी आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com