Sambhaji Bhide controversial statement
Sambhaji Bhide controversial statement 
विदर्भ

संभाजी भिडेंची जीभ घसरली; डॉक्टर हरामखोर...

सरकारनामा ब्युरो

अमरावती : शिव प्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. अमरावतीत आयोजित कार्यक्रमात बोलताना आता पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरली आहे. "डॉक्टर हरामखोर आहेत. लुटारू आहेत आणि आपटून मारायच्या लायकीचे आहेत," असं विधान संभाजी भिडेंनी केलं आहे. (Sambhaji Bhide controversial statement News)

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या महामारीमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला होता. गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा हा संसर्ग काही प्रमाणात ओसरला आहे. मात्र महामारीच्या या काळात डॉक्टरांवरच संपूर्ण जग अवलंबून होते. या काळात अनेकांनी प्राण गमावले. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या अनेक डॉक्टरांनाच कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे प्राण गमवावे लागले. संभाजी भिडेंनी मात्र याच डॉक्टरांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.

"कोरोना काळात 105 टक्के लोकांचा भीतीनेच जीव गेला. माणूस जेवढा शिकलेला तेवढाच तो गाढव असतो. डॉक्टर नालायक आहेत, लुटारू आहेत, हरामखोर आहेत. डॉक्टर आपटून मारायच्या लायकीचे आहेत. मरू द्या, पण त्यांच्याकडे कधीही जाऊ नका," असं भिडेंनी म्हटले आहे.

मात्र संभाजी भिडेंनी अशी विधाने आजच नाही तर यापूर्वीही केली आहेत. 'कोरोना गां--- प्रवृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. जी माणसं कोरोनाने मरतात ती जगायच्या लायकीची नाहीत. दारुची दुकानं उघडायला परवानगी, पण रस्त्याव काही विकणाऱ्याला मात्र पोलिसांच्या काठ्यांचा मार. काय चावटपणा चाललाय हा? महानालायकपणा आहे. लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असले शासन फेकून दिलेे पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही. हा केवळ मूर्खपणा चालला आहे. कोरोना हा रोगच नाही. हा गां&%$ वृत्तीच्या लोकांना होणारा मानसिक रोग आहे. काहीही होत नाही,' अशी वक्तव्ये संभाजी भिडेंनी यापूर्वीही केली होती.

''जगात कशात नाही जमले ते एका गोष्टीमुळे आपला क्रमांक १ नंबरमध्ये लागतो,'' असे संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, “जगात १ क्रमांकची लोकसंख्या असलेला देश चीन, मग आपला देशाचा क्रमांक १ कधी येणार, तो क्रमांक आपण मिळवला आहे. पण तो कोणत्या गोष्टीत लोकसंख्येमध्ये जमलं नाही आपल्याला चीन त्यात पुढे आहे. जो आपला कट्टर दुश्मन, वैरी आहे. पण हिंदूंना मेंदू असतो आपला क्रमांक १ आहे. कशात तर निर्लज्जपणामध्ये, जगाच्या पाठीवर १८७ राष्ट्र आहेत त्या राष्ट्रात पारतंत्र्य असते, परदास्य, परवशता, गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा, लाज वाटत नाही. अशा बेशरम लोकांचा, निर्लज्ज लोकांचा १ अब्ज २३ कोटी लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान” असंही त्यांनी काही महिन्यांपूर्वी म्हटले होते.

गेल्या वर्षी आषाढी वारीच्या दरम्यान त्यांनी असेच वक्तव्य केलं होतं. कोरोना हे निव्वळ थोतांड आहे, शासन हा थोतांड का वाढवत आहे कळत नाही, हे देशात चाललेले षडयंत्र आहे. कोरोनामुळे आज देशातील लोकांमध्ये फक्त भीतीचं आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वारीला जर बंदी घातली नसती, तर कोरोनामुळे मृत्यूचे एकही उदाहरण मिळाले नसते कोरोना हे षड्यंत्र आहे. देशाचे हे दुर्दैव आहे, असंही त्यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT