Eknath Shinde-Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Samruddhi Mahamarg : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची नागपूर ते शिर्डीपर्यंत ट्रायल घेणार!

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ११ डिसेंबरला हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला महाराष्ट्रात येणार आहेत. पंतप्रधानांच्या या नियोजित दौऱ्यावर पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर ते शिर्डी पर्यंतच्या समृद्धी महामार्गाची पाहणी करायला पोहचले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दरम्यान नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही आज सकाळी नागपूरला आगमन दाखल झाले आहेत. सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समृद्धी मार्गाच्या नागपूरकडील झिरो माईल्स (महामार्गाचे सुरुवातीचे ठिकाण) येथून ते प्रवासाला सुरुवात करतील. नागपूर ते शिर्डी पर्यंतचा प्रवास आज ते करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता शिर्डी येथे पोहोचतील. त्यानंतर शिर्डी विमानतळावरून मुख्यमंत्री नवी दिल्लीकडे रवाना होतील.

उपमुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी :

दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला लक्षात घेऊन काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणा तालुक्यातील वायफळ या गावाजवळील कार्यक्रम स्थळाला भेट दिली. कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,व अन्य अधिकारी उपस्थित होते. या ठिकाणच्या व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांनी काही सूचना केल्या.

समृद्धी महामार्ग हा एकूण ७०१ किमीचा लांबीचा महामार्ग आहे. हा महामार्ग नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गावापासून ते ठाणे जिल्ह्यातील आमने गाव यांना जोडणारा महामार्ग असून, यामुळे राज्यातील रस्त्यांचे जाळे एकमेकांशी जोडून दळणवळण गतीमान होईल. एकूण १२० मीटर रुंदीचा हा सहा पदरी महामार्ग असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT