Sangrampur Project Sarkarnama
विदर्भ

Sangrampur Project : तिरोडा विधानसभा मतदारसंघातील प्रगतीपुस्तकावर रंगली चर्चा

MLA Vijay Rahangdale : संग्रामपूर मध्यम प्रकल्प आमदारांच्या प्रगती पुस्तकावर

अभिजीत घोरमारे

Gondia Politics : गोंदिया जिल्हाच्या तिरोडा विधानसभा मतदारसंघात येणारा संग्रामपूर मध्यम प्रकल्प आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रगती पुस्तकावर आला आहे. संग्रामपूर मध्यम प्रकल्प तसेच हरी तलावाबाबत विद्यमान भाजप आमदार विजय राहांगडाले यांनी काय केले? असा उहापोह करीत कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली आहे.

हरी तलावाच्या माध्यमातून सिंचनाची क्षमता वाढावी आणि कालव्यांची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेवर पाणी मेळावी, ही मागणी मागील अनेक वर्षापासून कायम आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकटही निर्माण होते. ही बाब हेरूनच सोशल मीडियावर या चर्चेला सुरुवात झाली आहे.

राज्य शासनाच्या गोंदिया पाटबंधारे विभागांतर्गत संग्रामपूर मध्यम प्रकल्प तसेच हरी तलाव ही जलाशये येतात. दोन्ही जलाशयाला लागून वन विभागाची जागा आहे. नैसर्गिकरित्या जंगलातील येणाऱ्या पावसामुळेच दोन्ही जलाशयात पाण्याची पातळी वाढत असते. या पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगमात सिंचनाची सोय होत असते. शेतकऱ्यांना खरीप हंगामातील शेवटच्या सत्रात लागणारे पाणी याच तलावातून मिळते. उरलेले पाणी रब्बी हंगामातील पिकांना दिले जाते. मात्र दोन्ही जलाशयाचे कालवे अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत.

जलाशयातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यापैकी अर्धे पाणी शेतीपर्यंत जाते. अर्ध्या पाण्याचा अपव्यय होतो. दोन्ही प्रकल्पाच्या सिंचन पातळीत वाढ व्हावी, यासाठीही लक्ष देण्यात आलेले नाही. कालव्यांची दुरुस्ती झाल्यास रब्बी हंगामातही मोठ्या प्रमाणात क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. तेव्हा दोन्ही जलाशयातील गाळ काढणे, कालव्यांना नवीन लायनिंग, तलावाची पाळ, गेट, रपटा यांची नव्याने बांधकाम करण्यात यावे, यासाठीचे निवेदन जिल्हा परिषद. सदस्य अश्विनी पटले यांनी उपमुख्यमंत्र्यांना 20 डिसेंबर रोजी दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशात 2 डिसेंबरला 2023 रोजी एकोडी क्षेत्रात आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रम आयोजित होते. त्या अनुषंगाने मागील 2 दिवसांपासून सोशल मीडियातील एकोडीच्या एका ग्रुपवर संग्रामपूर मध्यम प्रकल्पाला घेवून एका शेतकरी कार्यकर्त्याने संग्रामपूर मध्यम प्रकल्पाबाबत टिप्पणी केली. हा प्रकार लगेच दुसऱ्या कार्यकर्त्याने उचलून धरला. दोघांमध्ये चांगलाच सोशल वॉर रंगले. ही बाब राजकीय क्षेत्रातही चर्चेचा विषय ठरली.

शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प असल्याने यावर शासन प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनीही लक्ष देणे गरजेचे झाले आहे. अशात आमदार विजय राहांगडाले यांच्या प्रगती पुस्तकाची चर्चा झाल्याने हा मुद्दा अधिक रंगतदार झाला आहे.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT