sanjay gaikwad sarkarnama
विदर्भ

Sanjay Gaikwad : सुधारतील ते आमदार गायकवाड कसले! आधी बेताल वक्तव्य, नंतर माफी मागण्यास नकार; आता पुन्हा धमकी

Sanjay Gaikwad On rahul Gandhi : आमदार गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वक्तव्यानं केल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. यातच आमदार गायकवाड यांनी पुन्हा मग्रुरीची भाषा केली आहे.

Akshay Sabale

शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वादंग निर्माण झाला आहे. 'आरक्षण रद्द करण्याबाबतचे विधान करणाऱ्या राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रूपयांचे बक्षीस देऊ,' असं आक्षेपार्ह विधान गायकवाड यांनी केल्यानं नवा वाद निर्माण झाला. गायकवाड यांच्या विधानावर काँग्रेसनं जोरदार टीका केली.

याप्रकरणी गायकवाड यांच्याविरोधात बुलढाणा येथे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पण, सुधारतील ते आमदार गायकवाड कसले. माफी मागण्याऐवजी गायकवाड यांनी काँग्रेसला धमकी दिली आहे.

अमेरिका दौऱ्यावर असताना राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी, "देशात अनुकूल सामाजिक परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण रद्द करण्याचा विचार करू," असं विधान केले होते. या विधानावरून भाजप, बहुजन समाज पक्ष, शिवसेना आणि भाजपच्या इतर काही मित्रपक्षांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर सडकून टीका केली.

गायकवाड काय म्हणाले?

सोमवारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड ( Sanjay Gaikwad ) यांनी राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीकास्त्र डागलं. संजय गायकवाड म्हणाले, "महाराष्ट्रात आणि देशात आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मागासवर्गीय, आदिवासी आणि अन्य प्रवर्गातील लोकांना आरक्षण दिलं. मात्र, राहुल गांधींनी विदेशात जाऊन, 'माझ्या देशातील आरक्षण संपवायचं आहे,' असं विधान केलं. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला असून राहुल गांधींनी त्यांच्या पोटातील मळमळ बाहेर ओकली,"

"लोकसभा निवडणुकीत संविधान धोक्यात आहे, असा फेक नरेटिव्ह सेट करून काँग्रेसनं मते घेतली. आज ते आरक्षण संपविण्याची भाषा करू लागले आहेत. 100 टक्के काँग्रेसला मागासवर्गीय, ओबीसी आणि आदिवासींचं आरक्षण संपवायचं आहे. राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देईल," असं विधान संजय गायकवाड यांनी केलं होतं.

राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून संजय गायकवाड यांना लक्ष्य करण्यात येत आहे. संजय गायकवाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागावी, अशी मागणी होत आहे. मात्र, गायकवाड यांनी माफी मागण्यास साफ नकार दिला असून वरून दमदाटीची भाषा केली आहे.

वक्तव्यावर ठाम...

संजय गायकवाड म्हणाले, "राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल मीच माफी मागण्यास तयार नाही. तर, मुख्यमंत्री शिंदे कशाला माफी मागतील? मी माझ्या विधानावर ठाम आहे. 140 कोटींपैकी 50 टक्के जनतेला आरक्षण आहे. ते आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्याबद्दल मी जे वक्तव्य केले, त्यावर मी ठाम आहे."

गाडून टाकण्याची धमकी...

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 19 सप्टेंबर रोजी बुलढाण्यात कार्यक्रम आहे. दुसरा कार्यक्रम 'लाडकी बहीणी'ची आहे. गोरगरीब शेतकरी महिलांचा आहे. माझ्या कार्यक्रमात काँग्रेसच्या कोणी कुत्र्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला, तर तिथेच गाडू टाकू. आमच्या रोडवर पाय ठेवून दाखवावं. तुम्हाला समजेल शिवसेना काय आहे?" असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT