Sanjay Rathod  Sarkarnama
विदर्भ

Sanjay Rathod : दोन वर्षांपूर्वी राजीनामा दिला, पण बंजारा समाजामुळेच पुन्हा मंत्री : राठोडांची प्रतिक्रिया!

Sanjay Rathod : बंजारा समाज नेहमीच पाठीशी राहिला..

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Rathod : भगतसिंग कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून हटवल्यानंतर राज्याचे मंत्री मंत्री संजय राठोड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राठोड म्हणाले की, "आज मी आपल्या पोहरादेवीतील कार्यक्रमात व्यस्त आहे. यामुळे याबद्दल मला काही कल्पना नाही. या प्रकरणावर मी बोलू इच्छीत नाही," असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलणयास टाळले.

ते पुढे म्हणाले की, "दोन-एक वर्षांपूर्वी मला एका वाईट घटनेला सामोरे जावे लागले. या प्रकरणी मला राजीनामा ही द्यावा लागला होता. परंतु आता पुन्हा अनेक दिवसांनंतर मला मंत्रिपदाची संधी नव्या सरकारमध्ये मिळाली आहे."

"संपूर्ण बंजारा समाज वाईट काळातही माझ्या पाठीशी उभा राहिलेला होता. .यामुळेच हे सगळं मला शक्य झालं. बंजारा समाजाची संस्कृती त्यांची परंपरा अत्यंत समृध्द आहे. पोहरादेवी परिसरसाचा, यास्थळाचा कायापालट घडवून आणण्याचा ध्यास, वसा आम्हीं घेतला आहे," असंही संजय राठोड यांनी सांगितंलं आहे.

"अतिशय उत्साहाचं वातावरण पोहरादेवी येथे आहे. राज्य सरकारने तसेच, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यासाठी ५९३ कोटी रूपयांचे निधी मंजूर केला. यासोबतच सेवादल याचं ध्वजारोहण होणार आहे. सोबतच सेवालाल महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे," असे राठोड म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT