Kasba by-election : कसब्याची चिंता करू नका, मी इथे बसलोय'; बापटांचे मुख्यमंत्री शिंदेंना आश्वासन

Girish Bapat News : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरुन राजकारण तापले आहे.
Eknath Shinde, Girish Bapat News
Eknath Shinde, Girish Bapat NewsSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरुन राजकारण तापले आहे. कसब्यामध्ये भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत आहे. त्यामुळे या निवणुकीच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांची भेट घेतली.

यावेळी बापट यांनी कसब्याची चिंता करू नका. मी इथे बसलोय, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले. गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या वेळी शिंदे आणि बापट या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या वेळी दोन्ही नेत्यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच कसब्यातील राजकीय समीकरणांवर चर्चा केली. बापट आता या निवडणुकीत स्वतः लक्ष घालणार आहेत. त्यामुळे भाजपसाठी ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.

Eknath Shinde, Girish Bapat News
Nashik Politics: नाशिकमध्ये काँग्रेसला धक्का; तांबे-थोरातांच्या समर्थनार्थ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

शिंदे म्हणाले, बापटांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. त्यांची तब्येत सध्या बरी नाही, आम्ही मित्र आहोत. सदिच्छा भेटीत आम्ही अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. दिलखुलास व मोकळे असे त्यांचे व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या दांडग्या इच्छाशक्तीमुळे ते लवकरच बरे होतील. आणि कामाला लागतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

Eknath Shinde, Girish Bapat News
Ambadas Danve : महाविकास आघाडीवर टीका करण्याआधी फडणवीसांनी याची उत्तरे द्यावीत..

शिंदे म्हणाले, कसब्याच्या पोटनिवडणुकीबद्दल बापट यांनी स्वतःच मला सांगितले. कसबा व चिंचवड या दोन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील. कसब्याची तर चिंता करू नका, मी इकडे बसलो आहे. आपले मोठे नेटवर्क कामाला लागलो आहे, असे बापट यांनी यावेळी सांगितले. या निवडणुकीत दोन्ही जागेवर भाजपचे (BJP) उमेदवार विजयी होतील असे शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com