Cm Uddhav Thackeray News, Sanjay Rathod Latest Marathi News, Shivsena News, Eknath Shinde News
Cm Uddhav Thackeray News, Sanjay Rathod Latest Marathi News, Shivsena News, Eknath Shinde News Sarkarnama
विदर्भ

संजय राठोड शिंदे गट सोडायला तयार; 'मातोश्री'च बोलावणं आलं तर पुन्हा जाईल

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Rathod : गुवाहाटीवरून परतलेले शिवसेनेचे शिंदे गटाचे बंडखोर आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शपथ घेतल्यानंतर आता आपल्या मतदारसंघात परत येत आहेत. मात्र त्यांना आपल्या मतदारसंघातील शिवसैनिकांना आपण बंडखोरी का केली? या प्रश्नाचे स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.(Sanjay Rathod Latest Marathi News)

असेच स्पष्टीकरण दिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना द्यावे लागले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच आमचे नेते असून माझ्या कार्यालयात आणि घरात त्यांचाच फोटो असेल. याबरोबरच मातोश्री'कडून मला बोलावणं आल तर मी पुन्हा जाईल, असे स्पष्टीकरण राठोड यांनी यवतमाळ येथील जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांशी बोलतांना दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यामुळे राज्यात सत्तेत असलेले महाविकास आघीडी सरकार कोसळले. यानंतर शिंदेसह बंड केलेल्या 40 आमदारांच्या आणि भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे यांनी सत्ता स्थापन केली असून शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि विधिमंडळात विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे. यामुळे बंडखोर आमदार आपल्या मतदारसंघात परतत आहेत. अनेक मतदारसंघात या बंडखोर आमदारांचे त्यांच्या समर्थकांकडून स्वागत केलं जात आहे. तर अनेकांना शिनसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

संजय राठोड म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेच आमचे नेते आहेत. माझ्या कार्यालयात आणि घरात ठाकरेंचाच फोटो असेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मला घडवलं असून शिवसेनेमुळेच माझी ओळख आहे. मात्र, मतदारसंघातील विकासकामे मार्गी लागावीत यासाठी आम्ही वेगळा उठाव केला आहे. याला बंड म्हणता येणार नाही. 'मातोश्री'वर मला बोलावल्यावर मी पुन्हा जाईल. मी शिवसेनेचाच आहे. त्यामुळे आम्हाला कोणी बंडखोर म्हणू नये, अशा शब्दात त्यांनी शिवसैनिकांना स्पष्टीकरण दिले. राठोड समर्थकांनी यवतमाळ येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठी गर्दी केली होती. यावेळी पोलीसांचा तगडा बंदोबस्तही लावण्यात आला होता.

दरम्यान, शिंदेंच्या गटातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये आता मंत्रिपदं कुणाला दिली जातील आणि भाजपाकडे कोणती मंत्रिपदे जातील यावर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री होते. मात्र, त्यावेळी त्यांच्यावर एका तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी त्यांचे नाव आल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT