ठाकरेंचे विश्वासू वरुण सरदेसाई नागपुरात दिसले; फडणवीसांसोबतचा फोटो व्हायरल

सरदेसाई हे मंगळवारी नागपूर विमानतळावर फडणवीसांना भेटल्याची चर्चा.
Varun Sardesai Latest News, Devendra Fadnavis Latest Marathi News
Varun Sardesai Latest News, Devendra Fadnavis Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यापासून दूर असलेले शिवसेनेच्या (Shiv Sena) युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई मंगळवारी नागपुरात होते. ते नागपूर विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचीही चर्चा आहे. दोघेजणांच्या हस्तांदोलनाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. (Varun Sardesai Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पक्ष कठीण काळातून जात असताना ठाकरे कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे वरुण सरदेसाई मात्र मुंबईत दिसले नाहीत. सोशल मीडियातही सक्रीय नाहीत. त्यामुळे चर्चांना उधाण आले असून आता ठाकरेंच्या विरोधकांनीही त्यावर बोट ठेवलं आहे.

Varun Sardesai Latest News, Devendra Fadnavis Latest Marathi News
तो 'माजी' सरकारी भाचा, 'Mr. India' झाला आहे का? नितेश राणेही सरदेसाईंच्या शोधात

त्यातच त्यांचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. नागपूर विमानतळावरील हा फोटो असल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस मंगळवारी पहिल्यांदाच नागपुरात आले. यावेळी नागपूर विमानतळावर सरदेसाई व फडणवीस भेटल्याचे समजते. दोघांचा हस्तांदोलनाचा एक फोटो समोर आला आहे. पण या भेटीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असताना वरुण सरदेसाई मुंबईत दिसलेच नाही. ठिकठिकाणी आंदोलन झाले, पण सरदेसाई आदित्य ठाकरेंसोबतही समोर आले नाहीत. मागील 20 दिवसांपासून ट्विटर व फेसबुकवर त्यांची एकही पोस्ट नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, वरुण सरदेसाई यांनी मंगळवारी नागपूर येथे नागपुर विद्यापीठ सिनेट निवडणूक संदर्भात रविभवन नागपुर येथे युवा सेनेची आढावा बैठक घेतल्याचेही समोर आले आहे. नागपुर युवासेना जिल्हा युवती अधिकारी प्रा. माधुरी पालीवाल यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सरदेसाईंबाबत ट्विट करत सवाल उपस्थित केला आहे. 'तो 'माजी' सरकारी भाचा, 'Mr. India' झाला आहे का?,' असं राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. भाच्यानेच उद्धव ठाकरे यांना दगा दिल्याचे राणे यांनी म्हटलं आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com