Chandrashekhar Bawankule meghana bordikar sanjay shirsat.jpg Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule: शिरसाट-बोर्डीकरांमध्ये खटके; मंत्री बावनकुळे म्हणतात, 'तो वाद फार मोठा नाही...!'

Sanjay Shirsat Vs Meghana Bordikar: सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मेघना बोर्डीकर यांना राज्यमंत्र्यांच्या अधिकारावरून पाठवलेल्या पत्रानं कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांच्यातील अधिकारावरून वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

Rajesh Charpe

थोडक्यात बातमी:

  1. राज्यमंत्री-कॅबिनेट मंत्री वाद पुन्हा उफाळला : संजय शिरसाट यांनी मेघना बोर्डीकर यांना पाठवलेल्या पत्रामुळे राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री यांच्यातील अधिकारवाटपाचा वाद पुन्हा चर्चेत आला.

  2. बावनकुळे यांचा संतुलित दृष्टिकोन : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही अधिकार राज्यमंत्र्यांना दिल्याचा दावा करत, वाद फारसा गंभीर नसल्याचे सांगितले.

  3. शिवसेना-राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष इशारा : बावनकुळे यांनी अधिकारांचे विकेंद्रीकरण अनिवार्य असल्याचा अप्रत्यक्ष सल्ला देत, पक्षीय नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी असे सूचित केले.

Nagpur News : सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मेघना बोर्डीकर यांना राज्यमंत्र्यांच्या अधिकारावरून पाठवलेल्या पत्रानं कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांच्यातील अधिकारावरून वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी संजय शिरसाट आणि मेघना बोर्डीकर वाद फार मोठा नसल्याचं मोठं विधान केलं आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (ता.26) माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठले अधिकार राज्यमंत्र्यांना द्यायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार कॅबिनेट मंत्र्यांना दिले होते. मात्र, आजवर एकाही मंत्र्याने तसे लेखी कळविलेले नाही. मात्र, आजवर एकाही मंत्र्याने तसे लेखी कळविलेले नाही. या वादावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण आपल्या खात्याच्या राज्यमंत्र्यांना काही अधिकार बहाल केले असल्याचा दावा केला आहे.

महसूल विभागात तीन हजारपेक्षा अधिक सुनावण्या घेण्याचे अधिकार राज्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. हा फार काही मोठा वाद नाही. आम्ही काही अधिकार राज्यमंत्र्यांना देत आहोत. कोणते अधिकार राज्यमंत्र्यांना द्यायचे याबद्दल विचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्या संदर्भात कॅबिनेट मंत्र्यांना विचारणा केली आहे. सर्व कॅबिनेट मंत्री त्यांच्या राज्यमंत्र्यांना काय अधिकार देत आहो हे सांगणार आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी कुठले अधिकार द्यायचे हे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना ठरवायचे आहे. मात्र यावर सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार राहणार आहे असे सांगून बावनकुळे यांनी अप्रत्यपणे शिवसेना व राष्ट्रवादीला अधिकाराचे विकेंद्रीकरण करावेच लागेल असा अप्रत्यक्ष इशारा दिला.

मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी असते. लोकप्रतिनिधीबाबत जनतेच्या मनात वाईट प्रतिमा निर्माण होऊ नये, लोकप्रतिनिधीबद्धल मत खराब होऊ नये असे वागणे व बोलणे सर्वांनीच टाळावे, याबाबत दक्ष राहावे असा सल्लाही यावेळी बावनकुळे यांनी दिला.

हल्ली रोहित पवारांना (Rohit Pawar) दिवसभर मीडियामध्ये राहायचे आहे. त्यामुळे तेसुद्धा काहीही आरोप करू लागले असल्याचे दिसते. फोन टॅप करणे सोपे नाही. त्यासाठी अनेक फॉर्मलिटीज असतात. असे कोणाचेही फोन कोणाला टॅप करता येत नाही.

संजय राऊत यांनी मंत्र्यांवर आरोप करताना नाव घ्यावे. ते केवळ हवेत आरोप करतात. त्यांचा कुठल्या मंत्र्यांवर आक्षेप आहे त्याचे नाव त्यांनी घ्यावे. रोज सरकारवर आरोप करणे, खळबळ उडवणे एवढेच काम सध्या त्यांच्याकडे असल्याचे बावनकुळे म्हणाले.

  1. प्रश्न: राज्यमंत्री-कॅबिनेट मंत्री वाद का उफाळला?
    उत्तर: संजय शिरसाट यांच्या पत्रामुळे मेघना बोर्डीकर यांच्या अधिकारांबाबत मतभेद निर्माण झाले.

  2. प्रश्न: चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय सांगितले?
    उत्तर: त्यांनी काही अधिकार राज्यमंत्र्यांना दिले असून वाद फारसा गंभीर नसल्याचे स्पष्ट केले.

  3. प्रश्न: मुख्यमंत्र्यांची भूमिका काय आहे?
    उत्तर: मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार वाटपाबाबत मत मागवत आहेत.

  4. प्रश्न: संजय राऊत आणि रोहित पवार यांच्यावर बावनकुळे यांनी काय टीका केली?
    उत्तर: त्यांनी हवेत आरोप न करता नाव घेण्याचे आव्हान दिले आणि सतत सरकारवर आरोप केल्याबद्दल टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT