Karuna Munde: अजित पवारांकडून मुंडेंच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाचे संकेत; करुणा मुंडेंनी 'ती' सगळीच प्रकरणं बाहेर काढली

Ajit Pawar On Dhananjay Munde : अजित पवारांनी जर वाल्मिक कराड प्रकरणासह इतर प्रकरणातूनही धनंजय मुंडेंना क्लिन चीट मिळाली आणि त्या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचं सिद्ध झालं, तर आम्ही त्यांना पुन्हा मंत्रि‍पद देऊ, असं वक्तव्य अजितदादांनी पुण्यात केलं होतं.
Karuna Munde Ajit Pawar Dhananjay Munde .jpg
Karuna Munde Ajit Pawar Dhananjay Munde .jpgSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमी:

  1. धनंजय मुंडेंना क्लिन चीट : कृषी विभागातील भ्रष्टाचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून धनंजय मुंडेंना क्लिन चीट मिळाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात पुनरागमनाची शक्यता अजित पवारांनी व्यक्त केली.

  2. करुणा मुंडेंचा संताप : करुणा शर्मा-मुंडे यांनी अजित पवारांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून, "धनंजय मुंडेंसारख्या व्यक्तीला मंत्रिपद देऊ नका" अशी स्पष्ट मागणी केली.

  3. गंभीर आरोप आणि मागणी: करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करताना, महादेव मुंडे व संतोष देशमुख हत्या प्रकरणांचा उल्लेख करत अजित पवारांना धक्कादायक शब्दांत सवाल केला.

Mumbai News: अन्न व नागरी पुरवठा मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर पाच महिन्यांतच मुंबई उच्च न्यायालयानं धनंजय मुंडेंना कृषी विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी क्लिन चीट दिली. यानंतर काही तासांतच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंडेंच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाचे संकेत दिले होते. यानंतर आता करुणा मुंडे (Karuna Sharma Munde) यांनी धक्कादायक विधान केलं आहे.

करूणा शर्मा-मुंडे यांनी शनिवारी (ता.26) उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील कमबॅकविषयी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, कोणत्याही चांगल्या माणसाला मंत्रिपद द्या, पण धनंजय मुंडेंसारख्या माणसाला तुम्ही मंत्रिपद देण्याची गोष्ट करू नका. तुम्हाला जर याबाबतचे पुरावे पाहिजे असतील, तर मी तुमच्याकडे येते. तुम्ही मला वेळ द्या, तुम्हाला सगळे पुरावे देते. ते सर्व बघा,आणि नंतर मंत्रिपद देण्याविषयी विचार करा असंही करुणा मुंडेंनी अजितदादांना म्हटलं.

करूणा शर्मा मुंडे संतापल्याचं दिसून आलं. त्या म्हणाल्या,धनंजय मुंडेंसारख्या घाणेरड्या व्यक्तीला जर तुम्ही परत परत मंत्रिपद देत आहात, तर ते सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Karuna Munde Ajit Pawar Dhananjay Munde .jpg
Eknath Shinde: मोठी बातमी: फडणवीसांनंतर शिंदेही घेणार अमित शहांची भेट? शिरसाट, राठोड,कदम यांचं मंत्रिपद वाचणार?

अजितदादा तुम्ही धनंजय मुंडे यांना परत मंत्रिपद देण्याची गोष्ट करत आहात, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. पण धनंजय मुंडे लोकप्रतिनिधी नाही, ते फक्त त्यांचा विचार करतात,अशी टीकाही करुणा मुंडे यांनी यावेळी केली. तसेच तुम्ही ज्ञानेश्वरी मुंडेंच्या परिवाराला, संतोष देशमुखांच्या परिवाराला, करूणा शर्माच्या परिवाराला विष द्या आणि नंतर धनंजय मुंडे मंत्रिपद द्या, अशी खळबळजनक मागणीही त्यांनी अजित पवारांकडे (Ajit Pawar) केली.

करुणा मुंडे पुढे म्हणाल्या, अजितदादा तुम्ही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. ज्ञानेश्वरी मुंडेंचे पती महादेव मुंडेंची हत्या प्रकरणाबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरण यांसोबतच आणखी काही प्रकरणं आहेत. जी गेल्या काही सहा ते सात महिन्यांपासून लोकांच्या समोर सर्व आली आहे.धनंजय मुंडेंनी सरकार व प्रशासनाचा गैरवापर करून येथे काळा कारभार आणि साम्राज्य उभं करून ठेवलं असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Karuna Munde Ajit Pawar Dhananjay Munde .jpg
Shaktipeeth Mahamarg: राजेश क्षीरसागरांचा 500 एकर जमिनीचा आरोप; राजू शेट्टींचा बिंदू चौकातूनच 'करारा जवाब'

गेल्या सहा-सात महिन्यांपासून तुम्ही हे सर्व पाहत आहात. तरी पण तुम्ही अशा घाणेरड्या व्यक्तीला मंत्रिपद देण्याची गोष्ट करत आहात. तुम्हाला इकडच्या जनतेचे दुःखं दिसत नाही. जनप्रतिनिधी असताना धनंजय मुंडेंनी संतोष देशमुख हत्या प्रकरण, महादेव मुंडे हत्या प्रकरण आणि माझ्या मुलाबाळांची काय अवस्था करून ठेवली होती, ती इथे येऊन पहा,असंही अजित पवारांना उद्देशून करुणा मुंडे म्हणाल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.25) पुण्यात मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील पुन्हा एन्ट्रीवर थेट भाष्य केलं होतं. ते म्हणाले, धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं, त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्यावर न्यायालयानं काय सांगितलं? त्यांना त्या प्रकरणात क्लिनचिट देण्यात आल्याचं अजित पवारांनी म्हटलं.

Karuna Munde Ajit Pawar Dhananjay Munde .jpg
Maharashtra Politics : अजितदादांकडून धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील 'कमबॅक'चे संकेत; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं, आकामुळे...

तसेच कृषी विभागातील त्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठेही दोष नाहीये, आता अजून त्यांच्या संदर्भातील एक गोष्ट आहे, त्यावर देखील पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं कारवाई करत आहे, या प्रकरणात जर त्यांना क्लिनचिट मिळाली तर आम्ही त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊ, असं विधान अजित पवार यांनी केल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

अजित पवारांनी जर वाल्मिक कराड प्रकरणासह इतर प्रकरणातूनही धनंजय मुंडेंना क्लिन चीट मिळाली आणि त्या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचं सिद्ध झालं, तर आम्ही त्यांना पुन्हा मंत्रि‍पद देऊ, असं वक्तव्य अजितदादांनी पुण्यात केलं होतं. पण त्यांच्या या निर्णयानंतर धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चर्चा जोरदारपणे सुरू झाली आहे.

Karuna Munde Ajit Pawar Dhananjay Munde .jpg
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंनीही केली तलवार म्यान; म्हणाले, ‘मी महाराजसाहेबांना (रामराजेंना) सर्व अधिकार दिले आहेत...’
  1. प्रश्न: धनंजय मुंडेंना कोणत्या प्रकरणात क्लिन चीट मिळाली आहे?
    उत्तर: कृषी विभागातील भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने क्लिन चीट दिली आहे.

  2. प्रश्न: अजित पवार यांनी काय संकेत दिले?
    उत्तर: क्लिन चीटनंतर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात पुन्हा संधी दिली जाऊ शकते, असा संकेत त्यांनी दिला.

  3. प्रश्न: करुणा मुंडेंनी काय आरोप केले?
    उत्तर: त्यांनी धनंजय मुंडेंवर हत्या प्रकरणात सामील असल्याचे आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचे आरोप केले.

  4. प्रश्न: करुणा मुंडेंची अजित पवारांना काय मागणी होती?
    उत्तर: त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "धनंजय मुंडेंसारख्या व्यक्तीला मंत्रिपद देऊ नये" आणि पुरावे देण्यासाठीही तयार असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com