Bharat Jodo Yatra, Shegaon, Latest News
Bharat Jodo Yatra, Shegaon, Latest News Sarkarnama
विदर्भ

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या स्वागतासाठी संतनगरी सज्ज; काँग्रेस नेते शेगावात दाखल...

सरकारनामा ब्यूरो

शेगाव : काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा शेगावला येण्यासाठी काही तासाचा अवधी उरला आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यस्तरीय नेते शेगाव शहरात दाखल झाले आहेत. दरम्यान, देशासाठी बलिदान देणाऱ्या गांधी परिवारातील एक सदस्य शेगाव शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच येत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. (Bharat Jodo Yatra, Shegaon, Latest News)

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 18 नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुमारास जवळा पळसखेड फाट्यावर पोहोचेल. त्या ठिकाणी राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर वरखेड फाट्यावर ज्या ठिकाणी रिंगण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे, त्या ठिकाणापर्यंत दिंडी काढून राहुल गांधीं यांना 21 फूट उंच विठ्ठलाच्या मूर्ती जवळ रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी वारकऱ्यांची वेशभूषा डोक्यावर टोपी, गळ्यामध्ये दुपट्टा आणि विणा अशा वारकऱ्यांच्या वेशभूषेत राहुल गांधी यांचे आगमन होणार आहे.

या ठिकाणी राहुल गांधी (Rahul Gandhi) हे एक हजार वारकऱ्यांसमवेत पावली खेळणार आहेत, दुपारी चार वाजता श्री संत गजानन महाराजांच्यामंदिरात जाऊन ते श्रींचे दर्शन घेणार असून त्यानंतर राहुलजींचे आगमन सभास्थळी बाळापुर रोड येथे होणार आहे. तेथे ते लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित करणार आहेत. 18 नोव्हेंबर रोजी राहुल गांधींची महाराष्ट्रातील ही शेवटची व शेगाव शहरातील पहिली होणारी जाहीर सभा ऐतिहासिक व न भूतो न भविष्यती अशी व्हावी, याकरिता काँग्रेसच्या नेत्यांनी जोर लावला आहे.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, आमदार राजेश ऐकडे,काँग्रेसच्या प्रदेश सचिव डॉक्टर स्वाती वाकेकर, प्रदेश प्रतिनिधी व खामगाव मतदार संघाचे पक्षनेते ज्ञानेश्वर पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन उर्फ बंटी सपकाळ, प्रदेश प्रतिनिधी राम विजय बुरुंगले, काँग्रेसचे (Congress) जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र पाटील, काँग्रेस पक्षाचे शेगाव शहराध्यक्ष किरण बापू देशमुख, जिल्हा सरचिटणीस कैलास बापू देशमुख, सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजेन्द्र सिंग चव्हाण, डॉक्टर जयंतराव खेडकर, प्रवीण सुरोशे, दीपक सलामपुरिया यांच्यासह काँग्रेस पक्षाचे जिल्हा व स्थानिक अधिकारी कार्यकर्ते हे परिश्रम घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT