Barti, Sarthi, Mahajyoti Autonomy : राज्यातील बार्टी, महाज्योती, सारथी आणि आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (TRTI) या संस्थांची स्वायत्तता मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. पण या हालचाली सुरु असल्याने या संस्थांच्या स्वायत्ततेला धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Sarathi, Barti, Mahajyoti's autonomy in danger)
प्रत्येक समाजाची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती पाहून त्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी या संस्थांच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यात आले आहेत. पण आता या स्वायत्त संस्थांचे प्रशिक्षण कार्यक्रम सारखेच असावेत, पण आता सर्व संस्थांच्या योजना या एकसारख्या करण्यासाठी यासाठी गेल्या आठवड्यात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या बैठकीत संस्थांच्या नियामक मंडळाने घेतलेले निर्णय या मुख्य सचिवांकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आले. पण हे नवे नियम लागू झाल्यास स्वायत्ततेला धक्का बसू शकतो, असे बोलले जात आहे. या संस्थांच्या नियामक मंडळाने ठराव घेतला की त्याची अंमलबजावणी न करता त्यांना मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्च अधिकार समितीची मंजुरी घ्यावी लागेल. या ठरावावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात यावे, यावरही चर्चाही झाली. पण हा ठराव पास झाल्यास या संस्थांच्या स्वायत्ततेला अर्थ राहणार नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. (Maharashtra Politics)
दरम्यान, राज्यात संस्थांच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी, योजना राबवणे , प्रशिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर बार्टी'च्या धर्तीवरच महात्मा जोतिबा फुले संशोधन व संस्था (महाज्योती ), छत्रपती शाहू महाराज संशोधन , प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) , तर अन्य बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI) सुरू करण्यात आली. पण या सर्व संस्थांच्या योजना या एकसारख्या करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या संस्थांच्या स्वायत्ततेला धक्का बसण्याची शक्यता असल्याचं बोलल जात आहे.
याबाबत बोलताना सामाजिक न्याय विभागाचे सचिव म्हणाले की, बार्टी, सारथी महाज्योती टीआरटीआय या संस्था स्वायत्त असल्याने त्यांना धोका असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण विविध संस्थामधील विद्यार्थ्यांचे आंदोलन बघता या संस्थामंध्ये एकसुत्रता आणण्यासाठी फक्त चर्चा झाली. पण याचे सर्वाधिकार हे संस्थांकडेच राहतील.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.