Akola Heat Wave Sarkarnama
विदर्भ

Heat Wave News : उष्णतेचा तडाखा! जळगावपाठोपाठ आता अकोल्यातही लागू झाले 'कलम 144'

Mayur Ratnaparkhe

Akola News : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. एकीकडे लोकसभा निवडणुकीमुळे गल्लापासून ते दिल्लीपर्यंतचं राजकीय वातावरण तापलेलं आहे. तर दुसरीकडे कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे वातावरणातील तापमानही असह्य होत आहे. याच पार्श्वभूमीवर उष्णतेचा धोका लक्षात घेता अकोला जिल्ह्यात 31 मे पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हा आदेश शनिवारी जारी केला आहे. मागील काही दिवसांपासून अकोलामधील तापमान प्रचंड वाढलेले आहे. आज अकोल्याचे तापमान(Akola Heat Wave) 45.06 अंश होतं. अकोलामध्ये जमावबंदी लागू होण्याआधी जळगाव जिल्ह्यातही तापमानामुळे हा आदेश तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेला आहे. मात्र याचबरोबर या ठिकाणी कलम 144 लागू करणं म्हणजे संचारबंदी किंवा लॉकडाउन नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर(Nagpur) कार्यालयाने 25 मे ते 31 मे या कालावधीत उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. उष्णतेचा फटका सर्वसमान्यांसह सर्वानाच बसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानावरही याचा परिणाम दिसून आला आहे. दुपारच्या वेळेत तर मतदारांनी घराबाहेर पडणंच टाळलं होतं. विदर्भातील शाळाही यामुळे उर्वरीत महाराष्ट्राच्या तुलनेत उशीराने उघडणार आहेत.

उष्माघाताचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करण्यासंबधीही सूचना देण्यात आल्या आहेत. खासगी शिकवणीच्या वेळेत बदल करणे, कष्टाची कामं करणाऱ्या कामागारांसाठी ते काम करत असलेल्या ठिकाणी सावलीची व्यवस्था करणे, पिण्याचे पाणी पुरसे जागोजागी ठेवणे, प्रथमोपचार पेटी आदींची व्यवस्थाही ठेवणे अशा काही सूचना संबंधित आस्थापनांसाठी करण्यात आलेल्या आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT